Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०६, २०२०

रेल्वे प्रवाशांना वाचविणाऱ्या जवानांचे कौतुक


अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: जिल्हाधिकारीनियंत्रण कक्षांच्या संपर्कात 
कोकणकोल्हापूर भागाचाही घेतला आढावानागरिकांना तातडीने सहाय्य करण्याचे निर्देश 

            मुंबई दि ६ : मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबईमुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थिती बाबत माहिती दिली आहे. 
            मुख्यमंत्र्यांनी काल रात्री आणि आज सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रमुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सूचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली.
रेल्वे प्रवाशांना वाचविणाऱ्या जवानांचे कौतुक 
            कालपासून (५ ऑगस्ट) आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमीकुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झालं. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता. तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडेविस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाली असून ठिकठिकाणी पडलेली झाडेव फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे  पलिकेने सांगितले. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशांना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले. मस्जिद बंदर येथे मोटार पंपाचा शॉक लागून रेल्वेचा एक कर्मचारी मरण पावला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 

पाण्याचा निचरापडलेली झाडे काढणे याला प्राधान्य 

            प्रथमच काल जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाताशेख मिस्त्री दर्गा रोडबीपीटी कॉलनी स्काय वॉकगोल देऊळमहर्षी कर्वे रोडपोलीस वसाहतभायखळाखेतवाडी आदि ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.
            शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोडून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहेते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली. 
कोल्हापूररायगडरत्नागिरी जिल्ह्यांना देखील सुचना
            कोल्हापूररायगडरत्नागिरी येथील परिस्थितीचा त्यांनी पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली व पुर परिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. 
एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवलीरायगड येथे कुंडलिका या  नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहावे असे मुख्यमंत्री म्हणाले. 
00000

मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ च्या 16 टीम तैनात
                                                            -मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई दि. 6 :  राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य  करण्यासाठी  राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसनआपत्ती व्यवस्थापन  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

            मुंबईकोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची  आपत्कालीन यंत्रणा  सज्ज आहे. राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा  सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन ही श्री.वडेट्टीवार यांनी केले आहे.
            मुंबई  5, कोल्हापूर 4 , सांगली 2 , सातारा 1, ठाणे  1 ,पालघर 1 , नागपूर 1, रायगड अशा एकूण 16 एनडीआरएफ च्या टीम  तैनात करण्यात आल्या आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.