बल्लारपूर गोळीबार प्रकरणात आरोपी असलेले दोन सख्खे भाऊ पोलिसांना शरण - पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल - पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात
या घटनेनंतर आरोपीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोहोचून सरेंडर केल्याची माहिती आहे.अमन आणि चीना असे आरोपींची नाव आहेत. आज दुपारी २ ते तीन च्या सुमारास गांधी काँप्लेक्स येथे अज्ञात इसमांनी गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली.सुरज बौरिया असे मृत इसमाचे नाव आहे.सुरज बौरिया याला जवळपास चार ते पाच गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बालारपूर पोलीस करीत आहेत.