Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०१, २०२०

कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू


आतापर्यंत 338 बाधित बरे ; 213 वर उपचार सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयातील एकूण चार जण बाधित
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 551
चंद्रपूर दि. 1 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे. गेल्या 24 तासात आणखी 28 पॉझिटीव्ह पुढे आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 551 झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै या 42 वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण 30 जुलैला रात्री अकरा तीस वाजता दाखल झाला होता. 30 जुलैला गंभीर अवस्थेत रात्री 11.30 वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी केला आहे. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक ऑगस्ट पर्यंत 551 कोरोना बाधित असून त्यापैकी 338 बरे झाले आहेत. तर 213 जणांवर सध्या उपचार सुरू आहे.
     24 तासात पुढे आलेल्या 28 रुग्णांमध्ये  वरोरा येथील 4बल्लारपूर येथील 2कोरपना येथील एकनागभीड एकचिमूर 2 घुग्घुस 3चंद्रपूर 13एक नागरिक सांगली जिल्ह्यातील आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव कॉलनी अन्ना नगर येथील रहिवासी आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात काल तीन पॉझिटिव्ह पुढे आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आदी सर्व कार्यालयातील कर्मचारी मिळून 114 लोकांची चाचणी पूर्ण करण्यात आली. याशिवाय जे कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या कुटुंबाची देखील चाचणी पूर्ण करण्यात आली आहे निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या कार्यालयातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या देखील आवश्यकतेनुसार चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या निकटच्या सर्व कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली आहे. यापैकी कोणीही कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले नाही. आज शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आपल्या निवासस्थानावरूनच जिल्ह्यातील कोरोना बाधित संदर्भातील आढावा घेतला. ते कॉरेन्टाइन झालेले नसून आपल्या निवासस्थानावरून कार्यरत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.