गणपती उत्सवात खंड पडू नये म्हणून मंडळानी घेतला निर्णय
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
वाडी परिसरात कोरोना झपाट्याने वाढत असुन आजपर्यंत कोरोना पॉजिटीव्ह ची संख्या २२० च्यावर गेलेली आहे त्यावर आळा बसण्यासाठी स्थानीक प्रशासन नव नवीन प्रयोग करीत आहे .स्थानीक प्रशासनाला साथ देण्यासाठी सत्यसाई सोसायटी नवयुवक गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्ते समोर आलेले आहेत . कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणपती उत्सवात खंड पडू नये म्हणून मंडळानी गणेशाची मुर्ती गणेश चतुर्थीला सकाळी बसवून गणेश मुर्तीचे संध्याकाळी विसर्जन केले . त्यामुळे हा गणपती फक्त एक दिवसाचा ठरला
दत्तवाडीतील सत्यसाई सोसायटी नवयुवक गणेश उत्सव मंडळाचे या वर्षीचे २९ वे वर्ष होते . या गणेश उत्सवाच्या माध्यमातुन सोसायटीमधील नागरीकांचे एक प्रकारे वार्षीक स्नेहसंमेलन होत होते .कोरोनाचे सावट असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने एक दिवसाचा गणपती बसविला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष केसरवाणी यांनी सांगीतले . यावेळी प्रा . मधुभाऊ माणके पाटील , प्रकाश जुनघरे , सुशील नाईक, बबनराव ढोबळे ,मनिष डवलानी, निलेश पलांदुरकर, अनिल चौधरी , मनिष मांगुलकर , दिनेश पंत , अरुण पाटील , नारायण केसरवाणी , अशोक वरघंटीवार , प्रमोद गुप्ता,श्री राव, पुष्पा वरघंटीवार ,उर्मिला चौरसिया प्रामुख्याने उपस्थित होते