चंद्रपूर/(खबरबात):
कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थीतीने सर्वसामान्य नागरिक, व्यवसायिक, लहान-मोठे दुकानदार त्याची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनलेली आहे. यातच विजेचे बिल मोठ्या प्रमाणात आल्याने ते कसे भरावे या विवंचनेत नागरिक आहेत. तेव्हा चंद्रपूरचे नागरिकांची वीजबिल माफ करण्यात यावे. अत्यल्प कर वसुली मुळे नागरिक महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावली असल्याने विकास कामांकरिता रुपये 10.00 कोटी निधीची मागणी माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी मा. ना.श्री प्राजक्त तनपुरे,राज्यमंत्री यांना आढावा बैठकीत केली.
कोरोना विषाणूच्या संसंर्ग टाळण्याकरिता शासनाने सुरु केलेल्या सर्वसामान्य नागरिक, मजूर, लहान - मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. व कोरोनाच्या संकटात त्यात वीज बिल जास्त आल्याने बऱ्याच लोंकावर मोठे संकट ओढावले आहे या लॉक डाउन कालावधीत रोजगार ,ऑफिस दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार बंद असल्याने नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे
अशात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याने बिल कशे भरावे हा एक मोठा प्रश्न नागरिकांसमोर उद्भवलेला आहे या विवनचनेत नागरिक आहे तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमित आर्थिक स्रोत असलेली मालमत्ता कर वसुली अत्यल्प झालेली आहे. या काळात नागरिकांची झालेली गैरसोय पाहता डिसेंबर २०२० पर्यंत नागरिकांना कर भरण्याची सूट तसेच शाशास्तीतही संपूर्णतः सूट महानगरपालिके तर्फे देण्यात आली आहे .
महानगरपालिकेला निधीची कमतरता सातत्याने भासत असून विकास कामे सुद्धा प्रलंबित राहण्याची शक्यता आहे मालमत्ता कर वसुली अत्यल्प झाल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेला विकास कामांसाठी रु. १०. ०० कोटी निधीची आवश्यकता असल्याने या सर्व बाबींवर लक्ष देऊन आज मा. महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी मा. ना. श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे राज्यमंत्री नगर विकास ,ऊर्जा , उच्च व तंत्र शिक्षण , आपत्ती व्यवस्थापन ,आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांना वीज बिल माफ करण्यास व चंद्रपूर शहराचा विकास कार्यासाठी रु. १०. ०० कोटी ची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
या प्रसंगी मा. श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती तथा उपमहापौर, आयुक्त श्री राजेश मोहिते सौ. शीतल गुरनुले, सभापती महिला व बालकल्याण समिती, सौ. चंद्रकला सोयाम, उपसभापती, श्री. प्रशांत चौधरी, सभापती झोन १, सौ. कल्पना बगुलकर, सभापती झोन २, श्री. सुरेश पचारे, सभापती झोन ३ नगरसेवक श्री. संजय कंचर्लावार, श्री. संदीप आवारी, श्री. रवी आसवानी व नगरसेविका सौ. जयश्री जुमडे उपस्थित होते.