अपात्र डॉक्टरकडून मशीनद्वारे तपासणी करणे पडले महागात
नागपूर(खबरबात):
गर्भधारणापूर्व आणि प्रसव पूर्व निदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंधक) अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करून अपात्र डॉक्टरकडून तपासणी करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून शहरातील मानकापूर येथील ॲलेक्सिस हॉस्पीटलवर पीसीपीएनडीटी समितीमार्फत बुधवारी (ता.८) कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉस्पीटलमधील सोनोग्रॉफी, इको, व्हॅन फाईडर आणि अन्य अशा एकूण सात मशीन जप्त करण्यात आल्या. आता जप्त केलल्या रेकॉर्डची तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा केली गेली. समितीच्या सदस्यांनी तक्रारकर्त्या सोबत चर्चा केली आणि रुग्णालयाचे प्रबंधन सोबत चर्चा केली. समिती सदस्यांनी या गंभीर त्रृटीची दखल घेत रुग्णालयांची सर्व सोनोग्राफी मशीन आणि रिकॉर्ड जप्त करण्याचा निर्णय घेतला. कारवाईमध्ये मशीनसह हॉस्पीटलचे रेकॉर्डबुकही जप्त करण्यात आले आहे. संबंधीत रुग्णालयाचे प्रबंधनामार्फत समिती सदस्यांना योग्य ते सहकार्य मिळाले आहे.