खासदार कृपाल तुमाने यांची उपस्थिती
नागपूर/अरूण कराळे(खबरबात):
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लावण्यात आली . मात्र दररोज मोल मजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर संकट कोसळले होते . त्यामुळे पहिल्या टाळेबंदीपासूनच गरजू व कामगारांना जनसेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाला अनुसरुन वाडीतील अनेक गरीब, मजूर कामगारांना शिवशक्ती नगर मध्ये शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय अनासाने यांच्या पुढाकाराने शिवशक्ती नगरातील दुर्गा मंदिरच्या प्रांगणात गरजवंताना अन्नदान तसेच अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले .
बुधवार ३ जुन रोजी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिवसेनेचे हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे ,शिवसेना हिंगणा विधानसभा संघटन प्रमुख संतोष केचे , मुख्यआयोजक तथा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय अनासाने ,युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे ,उपतालुका प्रमुख रुपेश झाडे ,अमोल कुरडकर यांच्या उपस्थितीत १५० गरजवंताना अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले .प्रास्ताविकतेमधून संजय अनासाने यांनी सांगीतले की ज्यावेळेस शासनाने सर्वत्र टाळेबंदी लागू केली तेव्हापासून ते चवथ्या टाळेबंदीपर्यंत नागपूर तालुक्यात तसेच वाडी शहरात शिवसेनेतर्फे गोरगरीबांना मदत करणे सुरू आहे.
कोरोनासारख्या महामारीसोबत लढा देतांना सर्व उद्योग धंदे व कामे बंद होती . त्यामुळे काही गरजवंताना जेवनसुध्दा पुरविले . जनसेवा हीच खरी मानव सेवा हे उद्दिष्ट समोर ठेवून शिवसेना कार्य करीत आहे . यावेळी क्रांती सिंग, कश्यप पाखीडे, संतोष शिंदे, अशोक भट्टाचार्य, संजय गोंडेकर, अरुण मानकर, संजय माहुलकर, ओमप्रकाश कांदियाल, शुभम रत्नपारखी, उत्तम फड प्रामुख्याने उपस्थित होते .