निफंद्रा (प्रतिनिधी)
सावली ग्रामीण रुग्णालयाला नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण परिषदेत संघाच्या वतीने क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सावली तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यात111 गावे समाविष्ट आहेत. आरोग्य सेवा सुरळीत ठेऊन जनतेला याचा लाभ मिळण्यासाठी सावली येथे ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. सदर रुग्णालयात जुनी रुग्णवाहिका असल्याने ती नेहमी ना दुरुस्त असते. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचार घेण्याकरिता रेफर करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधीकधी खाजगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य सेवेची निकड लक्षात घेता सावली चे ग्रामीण रुग्णालयाला नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका खासदार निधीतून देण्याची मागणी ग्रामीण पत्रकार संघाने खासदार अशोक नेते यांच्याकडे केली आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष सतीश बोमावार, प्रसिद्धीप्रमुख आशिष दुधे, सदस्य राकेश गोलेपल्लीवार, देवाजी बावणे आदी हजर होते.