आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्तीनंतर सकारात्मक चर्चा, विषय तात्काळ मार्गी काढण्याचे आश्वासन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमूळे अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यातच आता लग्न समारंभासाठी लॉन किव्हा मंगल कार्यालये बंद ठेवण्यात आली असल्याने यावर अवलंबून असलेल्यांनाही मोठ्या आर्थिक संकटातून समोर जावे लागत आहे. त्यामूळे ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे लॉन, मंगल कार्यालयात करण्यास परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीच्या पुर्तेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. दरम्यान काल शनिवारी या मागणीकरिता आमदार किशोर जोरगेवार यांनी गृहमंत्री अनिल देशमूख व लॉन, मंगल कार्यालय मालकांमध्ये बैठक घडवून आणली या बैठकीत लॉन मंगल कार्यालये सुरु करण्याच्या दिशेने सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी हा मुद्दा तात्काळ मार्गी काढण्याचे आश्वासन गृहमंत्री यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळयांच्या हंगामात विवाहासाठी लॉन मंगल कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने पूर्व नियोजीत विवाह सोहळे चांगलेच प्रभावीत झाले आहे. विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत घरीच करण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र घरी विवाह करतांना वर-वधू कडिल मंडळींना चांगलीच अडचण होत आहे. तसेच व-हाडयांचीही चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच जागे अभावी सामुहिक अंतर पाळण्यातही अडचण होत आहे. त्यामूळे लग्न समारंभासाठी लॉन किव्हा मंगल कार्यालय देण्यात यावे अशी मागणी होत आहे. तसेच लॉन मंगल कार्यालये बंद असल्याने त्यावर उपजिवीका असणा-यांपूढे संकट उभे झाले आहे. लॉन मंगल कार्यालय मालकही अडचणीत आले आहे. त्यामुळे विवाह सोहळयांसाठी लॉन मंगल कार्यालये सुरु करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांना हि आमदार जोरगेवार यांनी इमेल द्वारे निवेदन पाठविले आहे. दरम्यान काल गृहमंत्री अनिल देशमूख चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी लॉन, मंगल कार्यालयाचे प्रतिनीधी व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक घडवून आणली यावेळी लॉन मालक व मंगल कार्यालय मालकांमध्ये मंगल बल्की, मून्ना भंडारी, ज्ञानचंद्र, ओम जादी, आदिंची उपस्थिती होती. यावेळी लॉन व मंगल कार्यालय सुरु करण्याच्या दिशेने गृहमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. गृहमंत्री अनिल देशमूख यांनी लॉन व मंगल कार्यालये सुरु करण्यासंदर्भात तात्काळ निवेदन घेतल्या जाईल असे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांना दिले.