Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ०८, २०२०

चौदामैल होतेय कोरोनाचा दुसरा सतरंजीपुरा




१ वर्षाच्या मुलगा सुद्धा कोरोना पॉजीटीव्ह

एकाच परिवारातील १२ कोरोना पॉजीटीव्ह
संपूर्ण चौदामैल परिसर सील करून रेडझोन घोषित

गजेंद्र डोंगरे/बाजारगाव
संत्रागरीचे प्रवेशद्वार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील चौदा मैल (व्याहाड) येथे दि.०४/०६/२०२० ला तेथील ५४ वर्षीय महिलेची प्रकृती खराब झाली असता तिला प्रथम खाजगी रुग्णालयात व महिलेची लक्षणे बघता नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते तसेच त्या महिलेची स्वॅप घेऊन कोरोना चाचणी करिता पाठविण्यात आले व दि ०५/०६/२०२० ला रिपोर्ट पॉजीटिव्ह आल्याने कळमेश्वर येथील आरोग्य विभाग टीम घटनास्थळी पोहचून त्या परिसराची पाहणी करून परिवारतील 23 लोकांना कोरान्टीन साठी पाठविण्यात आले व दुसऱ्या दिवशी दि०६/०६/२०२० तारखेला मुलगा व सून चे रिपोर्ट पॉजीटिव्ह आल्याने आणखी 21 लोकांना नागपूर येथे कोरान्टीन साठी पाठविण्यात आले व आज दि ०७/०६ /२०२० ला त्याच परिवारातील ९ लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉजीटिव्ह आल्याने एकूण १२ कोरोना पॉजीटीव्ह ची संख्या झाली .यात एक वर्षाच्या मुलाला सुद्धा कोरोना झाला.यामध्ये या परिवाराचे
चौदामैल येथे याचे मोबाईल चे दुकानात होते व त्या दुकानात येणाऱ्या सर्व ग्राहकाचा आरोग्य विभाग तपास घेत असून सर्वाना तपासणी साठी नागपूर येथे पाठवणार असल्याची माहिती कळमेश्वर येथील ठाणेदार मिळूक व तालुका आरोग्य अधिकारी दीपाली कुलकर्णी यांनी दिली




सम्पूर्ण परिसर सिल करून रेडजोन करण्यात आले असून सर्व परिसरात सॅनिटायजर फवारणी करण्यात येत आहे व आरोग्य विभाग ची टीम ही परिसरात सज्ज आहे सर्वांची घरोघरी जाऊन विचारपूस करीत आहे. - डॉ. दिपाली कुलकर्णी (तालुका आरोग्य अधिकारी,कळमेश्वर)



परिसर सील करून कुणालाही आतमध्ये व बाहेर जाण्यास मनाई केली आहे तसेच सर्व पोलीस सतर्क असून परिसरात असणाऱ्या लोकांना वेळोवेळी मदत करीत आहे.
- मारोती मुळूक
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळमेश्वर)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.