नागपूर / अरूण कराळे (खबरबात):
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संचारबंदी सुरु आहे . रात्री ९ ते सकाळी ७ वाजता पर्यंत कोणालाही बाहेर फिरता येत नाही .कोणतेही वाहन चालविण्यास मनाई असतांना तालुक्यातील वाडी ,लाव्हा, दवलामेटी परिसरात मात्र चोरटयांनी धुमाकुळ घातला आहे .
सत्यसाई सोसायटी मधील स्वप्नील नारायणराव गोतमारे यांच्या मालकीची असलेली बुलेट दुचाकी एम एच ४० बीपी ४१९८ ही सुरक्षा भिंतीच्या आत मधून गुरुवार ४ जुन रोजी पहाटे दोन वाजता चोरटयांनी चोरून नेली बुलेट दुचाकी सोबत दोन दुचाकी सुरक्षाभिंतीच्या आत होत्या .सुरक्षा भिंतीच्या गेटला कुलूप लावले होते .बुलेट दुचाकी लॉक केली होती दुचाकीचे लॉक काढून तसेच सुरक्षाभिंतीचे कुलूप तोडून बुलेट दुचाकी लंपास केली . वीज गेल्यामुळे पहाटे ३ वाजता सुरक्षा भिंतीच्या आत नजर टाकली असता बुलेट चोरल्याचे दिसले . पहाटेच बुलेट चोरल्याची तक्रार वाडी पोलीस स्टेशनमध्ये नारायणराव गोतमारे यांनी केली .
वाडी परिसरात दुपारी तसेच रात्रीला वीज जाण्याचे प्रमाण वाढले असुन यावर वीजवितरण विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येते . गुरुवारी रात्री २ वाजता वीज गेली होती . त्याच अंधाराचा फायदा घेवून बुलेट चोरून नेल्याचे नारायणराव गोतमारे यांनी सांगीतले .
या घटनेचा तपास सुरू असुन बुलेट मात्र अजुनपर्यंत सापडली नाही ही घटना ताजी असतांनाच शुक्रवार ६ जुन रोजी लाव्हा गावात मध्यरात्री दोन शेतकर्यांच्या गायी चोरी करीत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने आता वाडी पोलिसांनी तातडीने चोरट्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. लाव्हा येथील निवासी शेतकरी नंदलाल नितनवरे व ग्रा. पं. जवळील निवासी विठ्ठल आगरकर यांच्या रात्री नेहमीप्रमाणे गाई गोठय़ात बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या गायी चोरून नेल्याचे सकाळी लक्षात येताच या दोघांनी शोध घेतला. पण, गायी आढळून न आल्याने सरपंच जोत्सना नितनवरे यांच्या घरी जाऊन ही आपबिती सांगितली.
घटना लक्षात येताच माजी पं. स. उपसभापती सुजित नितनवरे यांनी चार दिवसांपूर्वीच लाव्हा ग्रा. पं.च्या वतीने ग्रा. पं. समक्ष सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लाभाचा ठरला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे वाहन क्र. एमएच ४०- वाय ३१८७ ज्यावर ए. के. मिनी ट्रान्सपोर्ट लिहिले होते, गावात प्रवेश केला. या दोन्ही गायी वाहनात टाकून घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसून आले.शिवसेनेचे नेते संतोष केचे यांची पण गाय चोरीला गेले .यामुळे तिन्ही शेतकरी वाडी पोलिस ठाण्यात आले व त्यांनी या घटनेची माहिती दिली. उपस्थित अधिकार्यांनी माहिती नोंदवून घेतली.
शनिवारी पुन्हा सुजित नितनवरे व सहकार्यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांची भेट घेऊन कॅमेर्याच्या आधारे या चोरट्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, वाहन क्रमांकावरून ओळख पटली आहे. लवकरच गुन्हा दाखल करून चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला.वाडी परिसरात सहामहीन्यात साठपेक्षा अधिक जनावरे पळून नेल्याचे गुरे मालक सांगीतले . सीसीटीव्ही फुटेज मुळे आतापर्यंत पळून नेलेल्या जनावरांचा शोध लागु शकतो. त्यासाठी पोलीस विभागांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे.