Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २८, २०२०

पेट्रोल -डिझेल च्या भरमसाठ दरवाढीने अच्छे दिनाचा भाजप ने केला चुराडा! शिवसेनेची निदर्शने!

शिवसेनेचे आंदोलन



मोदी सरकारने जनतेचा विश्वास गमावला दिवाकर पाटणे
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने देशातील जनतेला खोटे व दिशाभूल करणारे आश्वासन दिले,अच्छे दिवसाचे स्वप्न दाखविले ,मतदारांनी विश्वास टाकला मात्र आता भाजपचे मोदी सरकार च्या कार्यप्रणाली ने व खास करून वाढत्या पेट्रोल-डिझेल दराने नागरिक-ट्रान्सपोटर्स त्रस्त झाले आहे.या तेल दरवाढीच्या विरोधात वाडी मंडळ शिवसेनेच्या वतीने रविवारी सकाळी तीव्र निषेध आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
अमरावती महामार्गावरील आठवा मैल प्रवेशद्वार समोर  शिवसेनेचे हिंगणा विधानसभा सह संपर्क प्रमुख दिवाकर पाटणे,नागपूर तालुका प्रमुख संजय अनासने यांच्या नेतृत्वात शिवसैनिक उपतालुका प्रमुख  अमोल कुरळकर, विजय समरीत,मंगेश चोरपगार,विनोद खांडेकर,नागेश्वर बोरकर,छोटू इंगळे,जॉन्सन अँथो्नी सायबाज बैस,विशाल मोवाडे, प्रफुल कडवे,कैलास साळवे नरेश मसराम,पवन दादूलकर,राजपूत,शुभदा पेशकार आदींनी केंद्रातील मोदी व भाजपा सरकार विरोधात जोरदार मोदी सरकार मुर्दाबाद,तेलाच्या व महागाई वाढविणाऱ्या सरकारचा निषेध असो,तेलाच्या वाढलेल्या किमती मागे घ्या अशा घोषणा देऊन नागरिकांचे व केंद्र शासनाचे लक्ष वेधले.शिवसेना नेते दिवाकर पाटणे व संजय अनासने यांनी रोष व्यक्त करताना सांगितले की लॉकडाऊन व कोरोना संकटाने आधीच सर्वच जनता संकटात भयग्रस्त झाली असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल ,डिझेल चे मनमानी दर वाढवीत आहे .परिणामतः आधीच संकटात सापडलेल्या जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे.ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोडकळीला आला आहे.ज्यांनी निवडणुकीला वारे मोदीचा नारा दिला ते समर्थक आता तोंड लपवत फिरत आहे.तात्पुरती समस्या विद्युत बिल भाजपाला दिसत आहे पण पेट्रोल दरवाढीच्या वेळेला अंध बनत आहे.केंद्र शासन गरज नसतानाही तेल दरवाढ करून व जनतेला संकटात टाकून कशासाठी लाभ कमवित आहे.सरकारचा एक ही निर्णय सध्या जनहिताचा दिसून येत नाही.आंदोलन कर्त्यांनी त्वरित पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.