चंद्रपूर/(खबरबात):
चंद्रपूर जिल्हा कामगार नेते बंडू हजारे शिवसेना माजी नगरसेवक ( मनपा) संघटनेचे जिल्हाध्यक्षयांच्या समवेत संघटनेचे पदाधिकारी शहरप्रमुख कैलास तेलतुंबडे , जिल्हाउपाध्यक्ष त्यागी भाई तसेच संघटनेच्या वतीने आज दिनांक ९/०६/२०२० ला जिल्हाधिकारी साहेब यांना रेती घाटावरील चोरी प्रकरणात झालेल्या कार्यवाही मध्ये दिरंगाई होत असल्याबाबत निवेदन देण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील चारगाव ,तेलवासा ,या गावांमध्ये असलेली शिरना नदी येथील अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती ग्रामीण लोकांनी दिली असता स्थावरील महसूल विभागाने कारवाई केली परंतु काही मोठे रेती स्टँक (वेकोली) च्या भागात येत असल्याने त्या स्ट्रॅक वरील कोणतीच कार्यवाही होत नाही आहे. सदर प्रकरण तहसील कार्यालयातून पोलीस स्टेशन ला सबधीवत गुन्हेगार व्यक्ती चा वाहनाचा तपशील दिला असून , आजपर्येंत वाहन जप्त झाले नाही.तसेच या प्रकरणातील सबंधीत गुन्हेगार व्यक्ती वर कोणतीच कार्यवाही झाली नाही.
अवैध रित्या उत्खन करणाऱ्या रेती माफिया (वासुदेव ठाकरे ) रा.भद्रावती यांची चौकशी करून अटक करावे या सबंधित प्रकरण लवकरात लवकर उघडीस करावे त्याकरीता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते बंडू हजारे यांच्या कडे छोटे रेती वाहक यांची मागणी केली. छोटे रेती वाहक यांना न्याय मिळावा म्हणून बंडू हजारे यांनी आता कंबर कसली आहे.