सर्वाधिक 23 रुग्ण अर्जुनीमोर तालुक्यात
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक २२मे २०२०.
नवेगावबांध:- ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्याला १९ मे पासून पुन्हा कोरोना विषाणूचा विळखा बसला. १९ मे रोजी २ त्यांनंतर २१ मे रोजी एकाच दिवसात २१ कोरोना बाधित आढळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी(ता. २२) यात पुन्हा ४ बाधितांची भर पडली. आजघडीला गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२ वर जावून पोहोचली. आधीचा १ आणि आजतागायत ३२ अशी एकूण गोंदियातील कोरोना ग्रस्तांची संख्या ३३ वर गेली आहे. गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचाराअंती त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झालेला आहे. १९ मे रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ तरूण आणि आमगाव येथील १ तरूणी कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर गुरुवारी(ता. २१) तब्बल २६ नमुने पॉजिटिव्ह आले. सलग दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारला(दि.22) परत जिल्ह्यात 4 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता 32 रुग्ण जिल्ह्यात पॉझिटिव्ह असून 1 रुग्ण निगेटिव्ह यापूर्वी झालेला आहे. 21 मे रोजी जिल्ह्यात एकासोबत 26 नवे रुग्ण आढळल्याबरोबर जिल्हा रेडझोनमध्ये गेलेला आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे मुंबई,पुणे येथून आलेले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेला अहवाल गोरेगाव 2, सालेकसा १ व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ रुग्णांचा आहे. गोरेगाव तालुक्यातील संबधित गावात गोरेगाव तहसिलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यातून आतापर्यंत 518 लोकांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 451 अहवाल प्राप्त झाले असून 67 नमुन्यांचा अहवाल दुपार 1 वाजेपर्यंत शिल्लक होता.
ही गावे झाली कन्टोनमेंट
अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी तालुक्यात रुग्ण आढळल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली, पांढरवाणी, डोंगरगाव, केसवलेवाडा, तिडका, कोदामेडी, सडक अर्जुनी, सावंगी, बाम्हणी, कोहमारा, सालईटोला, कन्हारपायली व उशीखेडा या गावांचा कंटेनमेंट झोन म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.तसेच बफऱ झोनमध्ये सुध्दा काही गावांचा समावेश अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.
असा आहे बाधितांचा ग्राफ
अर्जुनी मोरगाव : २३
सडक अर्जुनी : ०५
गोरेगाव : ०२
सालेकसा : ०१
आमगाव : ०१
गोंदिया : १
असे एकूण जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 एवढी झाली आहे.यात सर्वाधीक म्हणजे २३ रुग्ण अर्जुनीमोर तालुक्यातील आहेत,हे येथे उल्लेखनीय आहे.