येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला, ता. ०३ : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आरोग्य विभासोबतच एक घटक ग्रामीण भागात २४ तास काम करत आहे तो म्हणजे पोलीस पाटील अनेक अडचणींचा सामना करत ग्रामीण भागात खेडोपाडी संचारबंदीच्या काळात काम करत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः बाहेरून गावात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे लागते त्यातील अनेकांना होम क्वारनटाईन करावे लागत आहे. यातील काहीजण हातावर शिक्का मारलेला असतानाही उजळ माथ्याने गावात फिरत असतात त्यांना कायद्याचा धाक दाखवावा लागतो. त्यामुळे पोलीस पाटील अनकेदा या रुग्णांच्या संपर्कात आलेले असतात त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवली जात नसल्याने पोलीस पाटलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे शासनाने सुरक्षा साधने पुरवावीत अशी मागणी पोलीस पाटलांनी केली आहे.
सद्य स्थितीत येवला तालुक्यात एकूण १२८ गावे असून या १२८ गावांमध्ये १०५ पोलीस पाटील कार्यरत आहेत काही पोलीस पाटलांवर इतर गावाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कोरोनाच्या या साथीला आळा घालण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे रोजगारासठी शहरी भागात स्थलांतर केलेले अनेक कुटुंब कोरोनाच्या धास्तीने आपल्या मूळ गावी परतत आहेत त्यामुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना कामाचा ताण निर्माण झाला आहे कोरोना सोबतच शासनाने पोलीस पाटील या पदाकडे अनेक कामे सोपवली असून यात प्रामुख्याने गावपातळीवर रेशन धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होतो की नाही हे पाहणे अवैध व्यवसायांना आळा घालणे कायदा व सुव्यवस्था पाहणे यात अनेकदा अवैधरीत्या सुरु असलेल्या व्यवसायांना आळा घालत असताना पोलीस पाटलावर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत तालुक्यापासून दूर असलेल्या गावामध्ये प्रशासन पोहचू शकत नसल्याने पोलीस पाटलाना सामोरे जावे लागत आहे तालुक्यातील अनेक गावामध्ये महिला पोलीस पाटील असून त्या देखील प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहे ग्रामीण भागात सध्या जत्रा उरूस यांचा हंगाम आहे हे बंद करण्यासाठी पोलीस पाटलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर मस्जिद चर्च आदी धार्मिक स्थळे बंद करण्यात पोलीस पाटलांचा मोठा सहभाग आहे गाव पातळीवर काम करत असतना स्थानिक रोष घेऊन काम करावे लागत आहे थेट जनतेत जाऊन काम करावे लागत असल्याने चांगल्या दर्जाची सुरक्षा साधने पुरवण्यात यावीत शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ५० लाखाचा आरोग्य विमा देण्यात यावा पोलीस अतिरिक्त मानधन देण्यात यावे अशी मागणी भगवान सावळे दत्तात्रय आहेर भाऊसाहेब गायकवाड भरत पुरकर सुभाष शेलार मारुती पिंगट आदिसह पोलीस पाटलांनी केली आहे.
"पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले असून हा विषय कॅबिनेट बैठकीत मांडून उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे".
- सुभाष शेलार पोलीस पाटील, विखरणी