येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला, ता. ०२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी कड़े लोकडॉन असल्यामुळे गौमाता तसेच शहरातील मुके बेयवारस जनवरे हे पानी तसेच अन्न पाण्यासाठी गल्ली बोळ रोड यावर हिंडताना दिसत असल्याने येथील स्वामी मुक्तानंद जुनिअर कॉलेज चा विद्यार्थीने मुक्या प्राण्याना सामाजिक भावना जपत दररोज हिरवा चारा व घास मित्राच्या सह्याने तालुक्यात जिथे दिसेल तिथे आपल्या मोटर सायकलवर देत आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेहमीच नवीन उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग म्हणून रा.से.यो.चा तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील रसायनशास्राचा विद्यार्थी पवन व्यवहारे याने लॉकडाउन मध्ये येवल्यातील मुके जनावर उपाशी भटकत आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर मित्रांच्या साहाय्याने पवनने येवल्यातील सर्व मुक्या जनावरांना हिरवा चारा आणि घास आणून टाकल्याने येतील रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अजय विभांडीक, पी एन पाटील,यांनी व इतर स्तरावरुन त्याचे कौतुक केले जात आहे.