चंद्रपूर/प्रतिनिधी:(खबरबात)
राजुरा येथील ऍड. जयरामराव देशमुख बहुउद्देशीय न्यास तर्फे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केयर निधी मधे योगदान.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील देशमुख परिवार तसेच विस्तारित देशमुख परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येऊन कोरोना च्या संकटात राज्य तसेच देशाच्या मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलण्याच्या उद्दिष्टाने मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केयर फंडला प्रत्येकी 41000 रुपयांची देणगी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे मागील 350 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या देशमुख कुटुंबाच्या 14 व्या पिढीने सामाजिक दायित्व म्हणून तयार केलेल्या ऍड. जयरामराव देशमुख न्यास तर्फे याआधी सुद्धा पंतप्रधानांनी केलेल्या स्वच्छ भारत च्या आवाहनाला प्रतिसाद देत २०१५ साली शहरातील गरजू लोकांना मोफत शौचालय बांधून देण्याचा उपक्रम केला होता.
देशमुख कुटुंब तसेच विस्तारित परिवारातील सदस्यांनी आपसात व्हाट्सअप्प मार्फत संपर्क साधून कोरोना च्या लढाईत देशाच्या निधीत सहकार्य म्हणून यथाशक्ती योगदान देऊन हा निधी एका आठवड्यात उभारला. 82000 रुपये एकत्र करून 41000 रुपयांचे दोन धनादेश आज दिनांक 3 मे 2020 रोजी निवासी जिल्हाधिकारी, चंद्रपूर श्री. घनश्याम भुगावकर यांना सुपूर्द केले.
सार्वजनिक अंतर राखून न्यास चे अध्यक्ष श्री. विनायक देशमुख व उपाध्यक्ष प्रा. डॉ. सचिन वझलवार यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना हे दोन्ही धनादेश दिले.