Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १६, २०२०

रक्षणकर्त्यांनाच मारहाण;वाडीपोलीस स्टेशनच्या दोन पोलिसांना मारहाण


नागपूर / अरुण कराळे 
कोरोना महामारीत संपूर्ण देशात पोलिसांचा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.पोलिस विभाग व यंत्रणा नसता तर हाहाकार माजला असता.परंतु अशाही स्थितीत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर काही समाजकंटक हल्ला करतात आणि त्याची गुन्हेगारी लपविण्याचा केविलवाणी प्रकार संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी करीत असेल तर पोलीसांनी कोणाकडे न्याय मागायचा .

प्राप्त माहितीनुसार वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोवाडे ले - आऊट आठवा मैल येथे कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना जबरन मारहाण झाल्याने परिसरात वातावरण तापले आहे. शुक्रवार १५ मे रोजी सांयकाळी ६ वाजताच्या दरम्यान काही बदमाश प्रवृत्तीचे युवक दारू पिवून परिसरात हंगामा करित होते.

 दारूच्या नशेत परिसरातील नागरिकांशी असभयतेच वर्तन करीत होते. याबाबतची माहिती स्थानिक परिसरातील जागरूक नागरीकांनी कंट्रोल रूमला दिली. कंट्रोल रूम ने वाडी पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी वाडी पोलिस स्टेशनचे चार्ली ३ नंबर वर गस्तीवर असतांना पोलिस कर्मचारी हेड कॉस्टेबल सुरेश कवडते,पोलिस शिपाई रंजित धानेकर पोहचवून पोलिसांनी हंगामा करू नका असे सांगितले असता हंगामाखोर बदमाश पोलिसांवर भडकले व मोठ्याने आरडा- ओरडा करून अंगावर धावून गेले.

पाच आरोपीनी दारूच्या नशेत त्यांनी पोलिसांवर काठी व दगडाने मारहाण केली.मेजर सूरेश आणि रंजीत रक्तानी माखलेल्या अवस्थेत ठाण्यात पोहचले होते.

आरोपी संजय राऊत,रोहन राऊत,पवन गोंडाने,दिपक,यांच्याविरुद्ध १८६, १८८, १८९, २६९, २७०,३४ आपती व्यवस्थापना कायदा ५१ ( अ ) कारवाई केली.वाडी पोलीस स्टेशनच्या हलगर्जीपणा मुळे आरोपीना अटक केली नसल्याने आरोपी फरार झालेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी आरोपी विरुद्ध १८८ कलम लावले.पोलिसांना मारहाण करणे हा सर्वात मोठा गुन्हा असतांना तात्पुरती कारवाई केली.

तसेच या घटनेत ३०७ च्या कलमानुसार कारवाई होणे अपेक्षित असतांना आरोपींवर योग्य ती कारवाई झाली नसल्याने वाडी पोलिसात नाराजी आहे.तसेच आरोपी परिसरात सरास फिरत असल्याची माहिती पुढे येत आहे.रात्रंदिवस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना त्याच्याच पोलीस स्टेशन मध्ये अन्याय होतो हे न उकलणारे कोडे आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.