सुरक्षेसाठी दिले माक्स सँनिटाईजर, कठीनकाळी
देत असेलेल्या सेवेबद्दल केला सन्मान
चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोरोना संकटाशी लढतांना आशावर्कर यांचीही भुमीका मोठी आहे. त्यामुळे त्याची हि सेवा लक्षात आशावर्कर यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माक्स, सॅनिटाईजर, किराणा व धान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच चंद्रपूरकरांवर ओढावलेल्या संकटसमयी सेवा देत असल्यामूळे या आशावर्करांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची उपस्थिती होती
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व पोलिस विभाग प्रयत्न करत आहे. यात प्रशासनाला आशावर्कर यांचीही मोठी मदत मिळत आहे. शहरातील गरजुंचा सर्वे व इतर आवश्यक गोष्टींची माहिती आशावर्करच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचत आहे. अशात या आशावर्कर यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरक्षा म्हणून सॅनिटाईजर व माक्सचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर अत्यंत अल्प मानधनावर त्या देशसेवा करत आहे. त्याचा कामाची दखल घेत त्यांना मदत म्हणून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने धान्य व किराणा किट देण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. कोरोनाचे संकट ओढावल्यापासून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने समाजातील घटकांपर्यंत मदत पोहचविण्याचे काम सुरु आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांचेही यंग चांदा ब्रिगेडच्या कामावर लक्ष असून वेळो वेळी आवश्यक सुचना त्यांच्या वतीने दिल्या जात आहे. सुरुवातीच्या काळात जेवनाचे टिफीन अभियान यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात आले मात्र लाँकडाऊन वाढत जात असल्याने आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गरजुंपर्यंत किराना व धान्य किट पोहचवीली जात आहे. त्यातच आज गुरुवारी कठीण काळी चंद्रपूरकरांचीसेवा करणाऱ्या आशावर्कर यांना हि किट सुपुर्त करण्यात आली आहे. कठीण काळी आशावर्कर मोठ्या जबाबदारीने देश सेवा करत आहे.
अशा वेळी या आशावर्करच्या पाठीशी उभे राहण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांना दिल्या होत्या त्यांनतर सुरक्षेसाठी माक्स, सॅनिटाईजर व किराना - धान्य किटचे वितरण आशावर्कर यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. तसेच यावेळी जिव धोक्यात टाकून सेवा देत असलेल्या धाडसी अशावर्कर यांना सन्मानीतही करण्यात आले.