Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २१, २०२०

मोठी बातमी : चंद्रपूरात आणखी 9 जण पाॅझिटिव्ह


 
 चंद्रपूर : आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात 9 नवीन रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण चंद्रपुरातील क्वारंटीन सेंटरमध्ये दाखल होते. त्यांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. यामुळं आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 12 झाली आहे. यातील पहिला रुग्ण दोन्ही चाचण्यात निगेटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ( आताचे 9+ यापूर्वीचे 3) 12 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे 9 रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी 5 जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर 4 जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

१. वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले चार नागरिक नाशिक मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करीत होते. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चार नागरिक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वन अकादमी मध्ये ठेवण्यात आले होते. हे चार नागरिक चिरोली ( मूल ), जाम (पोंभुर्णा ) विसापूर ( चंद्रपूर ) विरवा ( सिंदेवाही ) परिसरातील आहे.

२. पुणे येथून आलेले पती-पत्नी वरोरा येथे यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात होते. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

३. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरातील एक वीस वर्षीय मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

४. चंद्रपूर जिल्ह्यातील आरवट येथील एकवीस वर्षाचा युवक ठाण्यावरून परत आला. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

५. ब्रह्मपुरी तालुक्यातील 21 वर्षीय युवक दिल्लीवरून परत आला सध्या वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहे.

हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) आहेत.१९ मे रोजी यांचे स्वॅब घेण्यात आले होते. सर्व नागरिक बाहेरून आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.