नाभिक समाज संघटनेचा पुढाकार
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 21 मे 2020
नवेगाव बांध:- येथे सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 मे ला नवेगाव बांध ग्रामपंचयतीमार्फत परवानगी दिली होती. परंतु बाहेरून काही संशयास्पद ग्राहकांची गर्दी वाढत होती. 11 मे पासून बाहेर जिल्ह्यातून व बाहेर राज्यातून मजुरांचे लोंढेच्या लोंढे परिसरात येत आहेत. आतापर्यंत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग आता मात्र धास्तावलेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सुद्धा निघाला आहे. ते पाहून नाभीक समाज बांधवांनी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव गावात होऊ नये, तसेच काही सलून दुकानदारांना देखील यापासून स्वतःचा बचाव करता यावा, यासाठी आपल्याला कोविड19 संसर्ग धोका टाळण्यासाठी म्हणून दि. 18 मे रोज सोमवार ला नाभिक समाज संघटनेने सभा घेतली. 18 मे पासून तर दिं. 31 मे पर्यंत सलून व्यवसाय बंद ठेवण्यात यावे. यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. नवेगाव बांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सहकार्य करावे. त्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाभिक समाज संघटनेचे दादाजी कावळे, किशोर दाने, सुरेश दाने, सुनील उरकुडे, लेमराज सूर्यवंशी व सर्व समाज बांधव उपस्थित होते. सलून व्यवसायिकांच्या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व समाजहिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.