जुन्नर /आनंद कांबळे
ग्रामपंचायत आंबे पिंपरवाडीचे माजी सरपंच कै.दुलाजी धोंडू सावळे गुरुजी यांचा मृत्यु झाल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवार (दिनांक 29 मे २०२० रोजी )मतदान पार पडले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पांडुरंग घोडे आणि गोविंद धावजी रेंगडे या इच्छुक सदस्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते.
मुकुंद घोडे यांस रंजना मारुती घोडे आणि मीरा अहिलू डगळे आणि उमेदवार स्वत: अशी तीन मते मिळाली तर गोविंद रेंगडे यास भरत सावळे आणि सौ. लता पुनाजी किर्वे आणि स्वतः अशी तीन मते मिळाली.
यावेळी सौ. अलका तुकाराम काठे या सदस्य तटस्थ राहिल्या त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. आणि पेच निर्माण झाला. तेव्हा निवडणूक अधिकारी यांनी चिठ्ठी टाकल्या आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्याच्या हातून एक चिठ्ठी निवडली. या चिठ्ठीत मुकुंद पांडुरंग घोडे याचे नावाचे असल्याने त्यांची ग्रामपंचायत आंबे या गावाच्या सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले.
मुकुंद घोडे हे यांचे अवघे वय २४ वर्षे असल्याने तालुक्यात तेच बहुदा सर्वात कमी वयाचे सरपंच असावेत. त्यांचे शिक्षण एम. ए. अर्थाशास्र या विषयची पुणे विद्यापीठाची पदवी घेतलेले आहे. कॉलेज जीवनापासूनच एस. एफ. आय या विद्यार्थी संघटनेत काम करत असल्याने तगडा अभ्यास आणि पुरोगामी चळवळीचा वारसा त्यांना आहे. शिक्षण घेत असतानाच आंबे घाटातील रस्ता, आंबे आश्रम शाळेतील प्रश्न यावर सातत्याने आवाज उठवला आहे
. आरोग्य शिबिरे, विद्यार्थी मेळावे यांचे आयोजन करण्यात पुढारपण केले. अशा लढाऊ आणि उच्च्य शिक्षित तरुणाची ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्याने आंबे ग्रामस्त आणि तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
या वेळी ग्रामस्थांना संबोधित करतना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वतःची स्वताच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. घाबरून कुणीही जाऊ नये. रोजगारासाठी गावातील एकही बेरोजगार, तरुण, मजूर, महिला गावाबाहेर जाणार नाही यासाठी येणाऱ्या १५ दिवसांत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीची कामे चालू केली जातील. अशी घोषणाही केली.
या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी डी. एस. लवांडे, तलाठी राजेंद्र अडसरे, ग्रामसेवक लहू भालिंगे यांनी काम पाहिले.