येवला: तालुक्यातील सायगाव फाटा येथे आज पाच च्या दरम्यान मिळाले तरसला जीवदान येथील शंकरवाडी ता. येवला येथील सोमनाथ बाबुराव घोडके यांचे मालकी गट न.108 मधील शेतातील विहिरीत एक तरस पडला असताना त्यावरून शासकीय वाहनाने पिंजरा व इतर साहित्य घेऊन 5.15 वा.घटनास्थळी पोहचून ,पिजऱ्याला चारही बाजूने दोर बांधून 50 फूट विहिरीत सोडला.परंतु तरस पिंजऱ्यात जात नसल्याने वनरक्षक श्री.हरगावकर यांना दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत 30 फुटावर उतरवले व बांबूच्या साहाय्याने तरसाच हुसकावून पिंजऱ्याकडे नेले,तरस पिंजऱ्यात जाताच गेट बंद केले व स्थानिक शेतकरी व वनकर्मचारी यांनी पिंजरा ओढून वर काढला.
या कामी वनपरिक्षेत्र अधीकारी येवला श्री.संजय भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मोहन पवार वनपाल राजापूर,श्री.प्रसाद पाटील वनरक्षक येवला,श्री.गोपाळ हरगावकर वनरक्षक राजापूर,विलास देशमुख वाहनचालक,सुनील बुरुख,मच्छिद्र आरखडे,मयूर मोहन वनसेवक व स्थानिक शेतकरी यांचे सहकार्य मिळाले आहे.