Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०८, २०२०

मेहा येथे श्रमदानातून साकारतेय अभ्यासिका





सावली /प्रतिनिधी
गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सावली तालुक्यातील मेहा बुज. गावातील विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारण्यात येत आहे. ही अभ्यासिका पूर्णता मोफत राहणार आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासिकेच्या निर्मितीसाठी गावातील तरुण विद्यार्थी आणि बाहेरगावी राहणारे नोकरीधारक तरुण श्रमदान, अर्थदान, पुस्तकदान करीत आहेत.

भविष्यात ई-लायब्ररी राहणार असून, संगणकांची रेलचेल येथे राहणार आहे. तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समुपदेशनही केले जाणार आहे. अभ्यासिका केंद्र’ येत्या महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

गावात ग्रंथालय किंवा अभ्यासिका नसल्याने गरजू आणि होतकरु विद्याथ्र्यांना अभ्यास करण्यासाठी बाहेरगावी राहावे लागत आहे. गं्रथालय व अभ्यासिकेची व्यवस्था झाल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची गोडी विद्याथ्र्यांमध्ये निर्माण होईल. अभ्यासिका केंद्रात गरिब आणि ज्यांच्याकडे सुविधा नाही, अशांनाही अभ्यासाची व्यवस्था होईल. जेणेकरुन गावातील मुलांना अभ्यास, स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठी तयारी करण्याची संधी मिळेल, अशी विनंती तरुणांनी ग्रामपंचायतीकङे केली. त्याला सुमारे 300 पालकांनी पाठिंबा दिला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या शेजारी बंद पङलेल्या जागेत या अभ्यासिका केंद्र सध्या निर्माणाधीन आहे. या केंद्राला ‘लूक’ देण्यासाठी गावातील कारागिर मोफत सेवा देत आहेत. भविष्यात वेगवान इंटरनेट कनेक्टिवीटी दिली जाणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला एखादी माहिती तातडीने मिळवायची असल्यास त्याला लगेच ‘कनेक्ट’ होता येणार आहे. विद्यार्थ्यांना आरामात बसून वाचन करण्याची सुविधा राहणार आहे. शिवाय पुस्तकांचा अद्ययावत संग्रह उपलब्ध राहणार आहे. सायंकाळी गावातीलच उच्च शिक्षित तरुण बालकांची मोफत शिकवणी घेणार आहेत. एकूण गावातील शैक्षणिक चेहेरामोहोरा बदलण्यासाठी हा वीङा उचलण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.