Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०८, २०२०

संकटकाळी टीम वर्कची गरज:पालकमंत्री नितीन राऊत

मानव सेवा हीच आपली खरी भारतीय संस्कृती,
वाडीत शिवसेना युवासेने तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप
नागपूर:अरूण कराळे:
देशावर जेंव्हा-जेंव्हा संकट आली त्या प्रसंगावर जात-पात,धर्म,पंथ न पाहता समस्त देशवासी एकत्र येऊन एकजुटीने संकटाचा सामना करून मात करत जगासमोर आपली एकात्मता दाखवून दिल्याचे अनेक प्रसंग आहे.राज्यावर ओढवलेल्या कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी समस्त महाराष्ट्र भेदभाव,पक्षभेद बाजूला सारत टीम वर्क प्रमाणे कार्य करीत असून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे.शासन सर्वोत्तपरी आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कटिबंध आहे.यासाठी आपल्या सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत शासकीय नियमाचे उल्लंघन करू नका.या रोगावर मात करायची असेल तर घराचे बाहेर निघू नको असे आवाहन नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. 
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन झाल्याने वाडी शहरात वास्तव्यास असलेला मध्यमवर्गीय कामगार वर्गाचा रोजगार बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी वाडी शहर शिवसेना युवासेना मित्र परिवाराने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीम वर्क राबवून संकटात सापडलेल्यांना मदत करा या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास दोन हजार नागरिकांना खासदार कृपाल तुमाने,राज्याचे ऊर्जा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत,पशुसंवर्धन,क्रीडामंत्री सुनील केदार,आमदार समीर मेघे,जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,तहसीलदार मोहन टिकले,नगराध्यक्ष प्रेम झाडे,मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. संचालन मुख्यआयोजक युवासेना जिल्हा प्रमुख बांधकाम सभापती हर्षल काकडे यांनी केले .
यावेळी संतोष केचे ,विजय मिश्रा,राजेश जयस्वाल,नरेंद्र मेंढे,संजय अनासाने ,नरेश चरडे ,प्रकाश कोकाटे,रुपेश झाडे,प्रा.मधू माणके पाटील ,वसंतराव इखनकर,अखिल पोहणकर शऋग्घसिंह परिहार,कपील भलमे,प्रफुल भलमे ,सचीन बोंबले,भुषण सोमकुवर,अमोल सोनसरे विलास भोंगळे,दिलीप चौधरी क्रांतीसिंह लोकेश जगताप,संतोष केशरवानी ,पंकज कौंडण्य ,कमल कनोजे ,चंद्रशेखर देशभ्रतार ,राजेंद्र शेळके ,दिवाणजी रहागडाले उपस्थित होते. मंत्री महोदय,खासदार,आमदार तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील स्वस्त धान्य दुकानात भेट देऊन ग्राहकाच्या समस्या जाणून दुकानात शासकीय नियमानुसार व सोशल डिस्टिक्सन ठेवत व्यवस्थितपणे धान्य वितरीत करण्यात येत असल्याबद्धल समाधान व्यक्त केले.










SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.