मूल: गरिब व गरजू लोकानां सवलतीच्या दरात जेवण मिळावे यासाठी राज्य शासनाने सुरु केलेली शिवभोजन थाळी योजना मूल तालुक्यासाठी सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली. शिवभोजन थाळी योजना मूल येथे सुरु करण्यासाठी काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत आणि पक्षाचे अन्य पदाधिका-यांनी पाठपुरावा केला हे विशेष!
कोरोना विषाणुचा च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे अनेक कुटुंबांच्या नेहमीचा रोजगार बुडाला. या कुटुंबांना आता पुढील काळात जीवन जगणे कठीण झाले आहे. या कुटुंबांना शिवभोजन थाळीचा माध्यमातून सवलतीमध्ये जेवण उपलब्ध करुन देता येइल. या उद्धात हेतूने मूल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांचे कडे मागणी सातत्याने रेटून धरली. कोरोना संबधाने मूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचे आढ़ावा घेण्यासाठी पालकमंत्री वडेट्टिवार येथे आले असतां काँग्रेस पदाधिका-यांच्या मागणीवर त्यांनी सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सांगितले. पालकमंत्री वडेट्टिवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली. तहसील कार्यालयाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र चालविणा-या ईच्छूकांकडुन अर्ज मागविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर,उपसभापती संदीप कारमवार,संजय मारकवार,राकेश रत्नावार,नगर सेवक ललिता फुलझेले,विनोद कामडे,अखिल गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार,शांताराम कामडे,डा. पदमाकर लेनगरे,किशोर घडसे,दशरथ वाकुडकर,सुनील गुज्जनवार,रुमदेव गोहने आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.