जुन्नर /आनंद कांबळे
अत्यावश्यक सेवा म्हणुन जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाहतूक मुंबईकडे सुरू आहे. तसेच मुंबईत भाजीपाला पोहोचल्यानंतर हीच वाहने ,वाहन चालक पुन्हा जुन्नर तालुक्यात येतात. वाहनांचे चालक पुन्हा समाजात इतरत्र फिरतात .ही वाहने तसेच वाहनांचे चालक यांच्या माध्यमातून करोना संसर्गाचा धोका उदभवू शकतो .अशी शंका सर्वत्र व्यक्त होत होती.यासाठी खबर दारीचा उपाय म्हणून मुंबईवरून परत येणारी वाहने व वाहन चालक यांचे सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व प्रशासन यांच्या वतीने सॅनिटायजेशनची उपाय योजना राबविण्यात येत आहे.नायब तहसिलदार सचिन मुंढे,गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी ही माहिती दिली. माळशेज घाट येथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंदनी व तपासनी तपास नाक्यावर केली जाते.याठिकानीच सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.परत येणारे वाहन पूर्णपणे सॅनिटाइज करून घेतले जाते.***---चौकटीसाठी मजकुर माळशेज घाटात पोलीस तपास नाका असल्याने घाटातुन पायी येण्यासाठीच्या असलेल्या पारंपरिक पायवाटावर देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच नारायणगाव पुणे नाशिक महामार्ग ,आळेफाटा नगर मुंबई महामार्ग याठिकाणी देखील वाहनांच्या सॅनिटायजेशनचीव्यवस्था करण्यात येत आहे. *फोटो ओळ---माळशेज घाट येथे तपास नाक्यावर मुंबई वरून परत येणाऱ्या वाहनांचे सॅनिटायजेशनची पाहणी करताना नायब तहसीलदार सचिन मुंडे,गटविकास अधिकारी विकास दांगट