पोलिसांनीच घेतले योगाचे धडे
वरोरा(शिरीष उगे)
वरोरा शहरातील रत्नमाला चौक जवळील उड्डाण पुलावर व नागपूर-चंद्रपुर महामार्गालगत सकाळी मॉर्निंगवाक करण्यासाठी वरोरा नागरिक पहाटे रोज येत असते यांची माहिती वरोरा पोलिसांनी पहाटे संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे समजताच आज दि. १८ एप्रिल ला पहाटे ५ वाजतापासून वरोरा पोलिसांनी मॉर्निंगवाक करणाऱ्यांना थांबवून त्यांना उद्या पासून दिसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वरोरा शहरातील उड्डाणपूल व आनंदवन ते रत्नमाला चौक पर्यंत रस्त्यावर पहाटे मॉर्निंगवाक करणारे व रस्त्याच्या कडेला व्यायाम, योगा करण्याकरिता गर्दी केली जात होती तसेच पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी कहीजन रस्त्यापासून दूरवर असलेल्या ले-आउटमध्ये गर्दी करीत होते. यामध्ये माढेळी, मार्डा गावाकडे जाणारे लेआऊटही सकाळी गर्दीने फुलून जात आहेत. त्यामुळे वरोरा पोलिसांनी लक्ष वेधून कारवाई करीत उद्यापासून रस्त्यावर गर्दी न करण्याचे आश्वासने दिली. ही कारवाही वरोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मडावी, साहाय्यक पोलीस निरीक्षक वावरे, दीपक दुधे, आपरेटवार, तुकाराम निषाद, लोधी तारळे यांनी केली आहे.