Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १४, २०२०

उंदिरवाडी येथील शेतकऱ्याने केली मध्यप्रदेशातील शेतमजुरांची खाण्यापिण्याची सोय




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला, ता. १४ : तालुक्यातील उंदिरवाडी येथील शेतकरी अरविंद क्षीरसागर हे मध्यप्रदेश येथील शेतमजुरांची मागील महिनाभरापासून मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा करीत आहेत.कारण,जगभरामध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने नरसंहार होत असून मानवी जीवनाची साखळी विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसत असल्याने सरकारने सदर विषाणूचा प्रादुर्भाव आपले कडे कमी प्रमाणात होऊन त्यास प्रतिबंध होऊन त्याचे समूळ नायनाट होण्यासाठी तात्काळ संपूर्ण देश आहे त्या जागी स्तब्ध लॉकडाऊन करण्यात आले परंतु मध्यप्रदेश येथील काही कुटुंब शेत मोलमजुरी करण्यासाठी येवला तालुक्‍यात यापूर्वीच आले असल्याने व त्यांची कुठेही राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था अगर हाताला काम नसल्याने तसेच त्यांना त्यांचे मूळगावी परत जाण्यासाठी लॉकडाऊन मुळे शक्य होत नसल्याने त्यांना या ठिकाणी राहणे गरजेचे होऊन गेले परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोट कसे भरावे याची चिंता सतावत असताना सदर बाब ही उंदिरवाडी येथील जागरूक शेतकरी अरविंद क्षीरसागर यांना समजल्याने त्यांनी मानवतावादी दृष्टिकोण समोर ठेवून स्वतः पत्र्याच्या रूम मध्ये राहत असताना सुद्धा त्यांच्या वस्तीच्या अंगणात ह्या मजुरांच्या कुटुंबीयांची निवाऱ्याची जागा उपलब्ध करून देऊन त्यांना पिण्याचे पाण्याची तसेच त्यांची स्वतःची हलाकीची परिस्थिती असून सुद्धा मजुरांची मागील महिन्यापासून जेवण्याची व्यवस्था उपलब्ध करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.आज हे गरीब कुटुंबातील सदस्य तेथे आनंदाने राहत आहे.हीच आपल्या भारताची आदर्श संस्कृती व परंपरा असून याचा प्रत्यय प्रत्येक व्यक्तीमध्ये संकटसमयी दिसून येत आहे.तसेच या मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबाची अवस्था येवला तालुक्यातील लोकप्रिय नेते सचिन कळमकर यांना समजताच त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन या गोरगरीब कुटुंबाला गहू तांदूळ डाळी उपलब्ध करून देऊन पुढील जेवण्याची व्यवस्था करून दिली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.