Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १६, २०२०

नवेगावबांध येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी




विलगीकरणाची व्यवस्था
आरोग्य विभागाद्वारे समुपदेशन
गावात सॅनिटायझरची दुसऱ्यांदा फवारणी


संजीव बडोले/नवेगावबांध.
-कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवेगावबांध येथे आरोग्य विभाग, महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायत व सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समिती नवेगावबांध यांच्या सहकार्याने गावामध्ये सॅनिटायझर ची फवारणी दुसऱ्यांदा दिनांक 15 एप्रिल पासून सुरू झाली आहे. टि पाईंट चौक, आझाद चौक, प्रशिक बुद्ध विहार, ग्रामपंचायत परिसर ,श्री बालाजी मंदिर परिसर, दुर्गा चौक इंदिरानगर, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय परिसर, गावातील गल्लीबोळात गावातील सर्व  सहाही प्रभागात सॅनि टायझरची फवारणी केली जात आहे. गावात निर्जंतुकीकरण युद्धपातळीवर केल्या जात आहे. गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यांनी अगोदर स्वतःच्या घरी न जाता ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, तलाठी कार्यालय येथे आपली नोंदणी करून, आरोग्य तपासणी करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगिकरन केंद्रात ठेवल्या जात आहे. बाहेरून येणाऱ्या गावातील नागरिकांनी सरळ घरी न जाता रुग्णालयात जाऊन  स्वतःचे आरोग्य तपासणी करून घ्यावे  व विलगीकरण केंद्रात राहावे, ग्रामपंचायतच्या वतीने  विलगीकरनात असलेल्यांना  सर्व सोयी सुविधा  पुरविल्या जात आहेत. अशी माहिती सरपंच अनिरुद्ध शहारे  यांनी दिली आहे .ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून, त्यांचे समुपदेशन केल्या जात आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण गावात आढळला नाही. अशी माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. संशयितांना केएटीएस रुग्णालय  गोंदिया येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला दिला जात आहे. ओपीडीच्या वेळी विशेष व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात केली जाते आहे. आलेल्या रुग्णांना विशिष्ट अंतर राखून उभे राहण्याचा सूचना दिल्या जातात व येणाऱ्या रुग्णांपैकी त्यांना कोरोनाव्हायरस चा संसर्ग झाला आहे काय? तशी लक्षणे दिसत आहेत काय? याची खातरजमा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ओपीडी च्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून तपासणी कक्षाची  व्यवस्था देखील रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी केली आहे.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी दिली. तर बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या घरी आरोग्य सेविका ,सेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या ,आशा सेविका घरोघरी जाऊन त्यांची तपासणी व विलगीकरणाचा त्यांना सल्ला दिला जात असून, त्यांच्यावर देखरेख ठेवीत आहेत.या सर्व उपाय योजनेवर सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण तलाठी पुंडलिक कुंभरे,  ग्रामपंचायत कर्मचारी  सचिन सांगोलकर , अशोक परशुरामकर , संदीप शहारे आरोग्य सेविका मांढरे, नागपुरे,आरोग्य सेवक भिमटे जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य संजय उजवणे  व ग्रामपंचायत सर्व सदस्य लक्ष ठेवून आहेत. या कामी गावातील नागरिक देखील सहकार्य करीत आहेत. नवेगाव बांध ग्रामस्थांनी प्रशासनाला असेच सहकार्य करावे व कोरोणापासून गावाला दूर ठेवावे .असे आवाहन ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.