भिवखिडकी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 23 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-Covid-19 या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 3 मे पर्यंत लॉक डाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रोजंदारी मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अन्नधान्य तर मिळेल परंतु इतर जीवनावश्यक वस्तूचे काय?त्यातच किराणा दुकानातून नगदी घ्यावे लागते. तसेच भाजीपाला पैसे देऊनच खरेदी करावा लागतो. हाताला काम नाही, त्यामुळे परिसरातील मजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाअडका नाही. या काळात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दि. 20 एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे व त्यांचे पती चामेश्वर गहाणे यांनी भिवखिडकी गावातील गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भिवखिडकी येथील गरजू कुटुंबांना रचनाताई गाहणे जिल्हा परिषद सदस्य व चामेश्वर गाहने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाच्या या संकटात अल्पशी मदत केली. त्या बदल भिवखिडकी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहे.