बसपा जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे प्रतिपादन
नागपूर : अरूण कराळे:
कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या नागरीकांना दोनवेळचे जेवण करणे कठीण झाले आहे . संचारबंदीच्या पहिल्या दिवसापासूनच आजपर्यंत दोन हजार गरजू जनतेला अन्नधान्याचे किट वाटप करून बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी सामाजिक जबाबदारी राबविली आहे.
संचारबंदी ३ मे नंतरही कायम राहीली तरीही नागपूर जिल्हयातील १२ विधानसभा मतदारसंघातील गरजू जनतेला अन्न धान्य किट वाटप करणार असल्याची माहिती बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी वाडी प्रेस क्लबला दिली. यावेळी हिंगणा विधानसभा अध्यक्ष पदावर शशीकांत मेश्राम ,उपाध्यक्ष संजय खडसे,कोषाध्यक्ष महेश वासनिक यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हयातील नागरिकांसाठी कोरोनासंदर्भात बसपा सार्वजनिक जागृतीही करणार आहे.
वाडी शहर हा ट्रानस्पोर्ट हब असून कामगार वर्ग जास्त प्रमाणात आहे. कामगारांना पुढे दोन वेळ जेवणाचा प्रश्न मोठा पडला आहे. आता बसपा गरजूंना पुढे येऊन मदत करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम,नगरसेवक नरेन्द्र मेंढे, हिंगणा विधानसभा प्रमुख रोशन शेंडे,हिंगणा विधानसभा अध्यक्ष शंशीकांत मेश्राम,नगरसेवक मनोज भांगे,अमित तायडे,सुधाकर सोनपिपडे,गोपाल मेश्राम,मनिष रामटेके,कुंदन कापसे, विरेन्द्र कापसे,प्रफूल पाटील, गौतम मेश्राम, सीताराम रहांगडाले, प्रनिश पानतावणे प्रामुख्याने उपस्थित होते.