Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २२, २०२०

जोरगेवार-जिल्हाधिकारी बैठक;बाहेरील जिल्ह्यातून चंद्रपूरात येण्याकरीता ६२ पाँईटवर येणार्‍या वाहनांचे निर्जतूकिकरन करा

चंद्रपूर: 
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याशी बैठक करत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाच्या कामाचेही कौतूक केले. तसेच या संचारबंदीत नागरिकांना होत असलेली गैरसोय दुर करण्याच्या दिशेने आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना महत्वाच्या सुचनाही केल्यात.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत नागरिकांच्या अडचणीतही भर घातला आहे. मात्र देशहितात नागरिक प्रशासनाला सहकार्य करतांना दिसून येत आहे. चंद्रपूरातही अशीच काहीसी परिस्थिती आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून सातत्याने विविध विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतल्या जात आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगवार यांनी संचारबंदीच्या काळात नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता काही ठराविक व्यवसायांना अटि व नियमांसह सुट देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्या आहे.

 यात हार्डवेअरची प्रतिस्थाने, मोबाईल शॉप, पुस्तक विक्रीचे दुकानांचा समावेश असून ठराविक वेळेसाठी हे दुकाने सुरु करण्यात यावेत अशा सुचना आमदार किशोर जोरगवार यांनी जिल्हाधिका-यांना आजच्या बैठकीत केल्या आहेत. तसेच संचाबंदीच्या काळात मासेमारी बंद आहे. मात्र आता मासेमारी सुरु करण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. संचारबंदीमूळे अनेक उद्योग व प्रतीस्थाने बंद असल्याने अनेक कुटुंब प्रभावित झाले आहे. 

त्यामूळे हा निर्णय घेण्यात यावा असे यावेळी जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना म्हटले. हे प्रतिस्थान सुरु झाल्यावर सामुहीक अंतर पाळत या दुकानमालकांनी विक्री करावी अशी सुचनाही पारित करण्यात यावी असे जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत म्हटले आहे.

तसेच वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता विद्यूत उपकरणांच्या दुकानातून विद्यूत उपकरण ग्राहकांच्या घरी पोहचविण्याची सुट देण्याच्याही सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्यात. बाहेरील जिल्ह्यातून चंद्रपूरात येण्याकरीता ६२ पाँईट आहेत. या पाँईट वरुन जिवनावश्यक वस्तुंचे मालवाहक वाहणे चंद्रपूरात येत आहे.

 या वाहणांना चंद्रपूरात दाखल होण्याअगोदर निर्जतूकिकरन करण्यात यावे तसेच या वाहनावरील चालक व वाहकाची योग्य तपासणी करण्यात यावी अशा सुचनाही यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या आहेत. बाहेरुन चंद्रपूरात दाखल होणा-या मालवाहकाची व या वाहनावर येणा-या चालक व वाहकाची माहिती ठेवण्यासाठी एँप्स विकसित करण्यात यावा अशा सुचनाही यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या आहे. .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.