गरजूंना अन्नधान्य किराणा साहीत्याचे वाटप
मैत्रेय महिला संघाचा स्तूत्य उपक्रम
नागपूर : अरूण कराळे
भारताच्या इतिहासात कर्णाने आपले नाव दानशुर म्हणून सूवर्ण अक्षराने नोंदविले आहे त्याच कर्णाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत आता कोरोनाच्या लढाईत विविध समाजकारण करणाऱ्या नागरीकांचे हात समोर येत असून कोरोनामुळे चक्क दानशुर कर्णाची फौज जन्माला आली आहे.
चिननिर्मीत कोरोना विषाणूचा हल्ला भारतासह जगावर झाला या विषाणूशी दोन हात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे .
त्यांना सहकार्य करण्यासाठी वाडी काचीमेट मधील मैत्रेय महिला संघा तर्फे गरजुंना दररोज २०० टिपीन डब्याचे वाटप करीत आहे. रविवार २६ एप्रिल रोजी दुपारी अन्नधान्य ,किराणा व मास्कचे वितरण करण्यात आले . संध्याकाळी वाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांना मास्क व फळांचे वितरण करण्यात आले.
चीन निर्मित कोरोनाचा नायनाट करू अशी शपथ
मैंत्रेय महीला संघानी घेतली आहे.
या उपक्रमासाठी मैत्रेय महीला संघाच्या करूणा लांजेवार, सुजाता गजभिये , सुनिता राजपूत (चव्हाण) , रश्मी साखरकर , सरिता चव्हाण , प्रिती गायकवाड , निराशा गणवीर, पायल गायकवाड , जस्सी दारोकर, ममता खेडकर , अनुरती मेश्राम, राजश्री ढोने, सौ हलमारे व रिना वर्मा आदींनी भाग घेतला .