चंद्रपूर/प्रतिनिधी:
लॉकडाऊनमूळे बाहेर जिल्ह्यासह बाहेरील राज्यातील अनेक नागरिक चंद्रपूरात अडकून आहेत. मागील महिणाभरापासून अशांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत पोहचवीली जात आहे. दरम्याण मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना केलेल्या विनंती नंतर चंद्रपूरात अडकुन असलेल्या आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील 160 विदयार्थ्यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने तिन क्विंटल तांदूळ पोचविण्यात आले आहे.
संचारबंदीमुळे अनेक कुटुंब अडचणीत आले आहे. या कुटुंबाच्या मदतीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मागील महिणाभरापासून प्रयत्न केले जात आहे. चंद्रपूरकरांसह चंद्रपूरात अडकलेल्यासांठीही यंग चांदा ब्रिगेड मदतीचा हात पुढे करत आहे. दरम्याण आध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यातील 160 विद्यार्थ्यी शिक्षणासाठी चंद्रपूरात आले होते. मात्र अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने हे विदयार्थी चंद्रपूरातच अडकुन आहेत. मात्र आता त्यांच्या जवळ असलेले राशन व पैसे संपल्याने ते अडचणीत सापडले होते. या विद्यार्थ्यांना मदत करण्यात यावी अशी विनंती मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना केली. आमदार किशोर जोरगेवार यांनी यावर तात्काळ कारवाही करत या विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्याच्या सुचना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिल्यात सुचना मिळताच क्षणाचाही विलंब न करता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या विद्यार्थ्यांना मदत केली आहे.
या विदयार्थ्यांच्या मागणी नूसार त्यांना तिन क्विंटल तांदूळ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले असून पूढेही मदत लागल्यास त्यांना मदत करण्याचे आश्वासन यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या आदेशानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गरजु पर्यंत शक्य ती मदत पोहचविण्याचे काम निरंतर सुरु ठेवले आहे. या कामासाठी यंग चांदा ब्रिगेडची विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे. परिणामी यंग चांदा ब्रिगेडची मदत अधिकाधिक लोकांप्रर्यंत पोहचु लागली आहे.