सामाजिक चळवळीशी आपले आयुध आहे आणि शेवट पर्यंत हे काम करणारच! असा ठाम विश्वास अंगी बाळगूण, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णांभाऊच्या विचाराने प्रेरित होऊन, समाजाच्या हितासाठी धडपड करणारा सामान्य माणसातला कार्यकर्ता आहे.
सामाजिक ,राजकीय चळवळीत काम करीत असताना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर बहुजन समाजाचा चेहरा. असा नावलौकिक असलेला नेता यांनी मागासवर्गीय समाजाच्या न्याय व हक्कासाठी "युगप्रवर्तक ग्रामीण विकास प्रतिष्ठाण" या नावाची आंबेडकर चळवळीशी निगडित, संघटना स्थापन केली. असून या संघटनेच्या माध्यमातून अनु. जाती,नवबौद्ध, मागासवर्गीय,भूमिहीन,बेघर,सफाईगार, याना न्याय मिळवून देणे . हे युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या जिव्हाळ्याचे काम बनले आहे. सामान्य माणसालाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. यासाठी त्यांनी आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत १७१ अनु जाती च्या वस्त्या मधील ३५० कुटुंबाना वनविभागाच्या व समाजकल्याण विभागा मार्फत ,७५% सवलतीचे गॅस कनेक्शन मिळवून देण्याचे कार्य केले अाहे. अनेक कुटुंबाना पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद पुणे मधून पिठाची गिरणी,ताडपत्री,शिलाई मशीन, सौरऊर्जा कंदील ,बेंजो साहित्य अशा अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून दिल्या आहेत. तर समाजाचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी अनेक शेती विषयक विशेष घटक योजना असेल शेळी पालन, कुकुट पालन,गाय गोठा, म्हैस पालन अशा अनेक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत .
अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यााचा विकास होण्यासाठी जिल्हापरिषदेतील समाजकल्याण विभाग मार्फत वस्ती मधील रस्ता ,कॉन्क्रीटीकरण, सार्वजनिक शौचालय,समाज मंदिर ,ग्रंथालय, हायमास्ट दिवे ,पेविंग ब्लॉक असतील नळ पाणी पुरवठा ,अंतर्गत भूमिगत गटारे इत्यादी योजना राबविण्याचे काम करीत आहेत. तर यशवंत घरकुल योजना, रमाई घरकुल योजनाचा लाभ वंचित गरीब व गरजू पर्यंत कसा पोहचला जाईल, याची दखल घेऊन, वैयक्तिक लाभार्थ्याशी संपर्क साधून, काही अडचणी असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करतात.
आंबेगाव तालुक्यात अनु. जाती व नवबौद्ध तसेच भटक्या जाती, जमाती,विशेष मागासप्रवर्गासाठी
सामाजिक न्याय विभागाचे एकही वसतिगृह नव्हते. या साठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करीत असतात. याचा पाठपुरावा करीत असताना, आंबेगाव तालुक्यातील आमदार व सध्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील. यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय आश्रम शाळा पेठ ता. आंबेगाव जि. पुणे. येथे ४ कोटी खर्चाची इमारत बांधून आज सुसज्ज अशी इमारत उभी आहे. येथे इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत सेमी इंग्लिश शाळा सुरू असून येथे दरवर्षी २०० गरीब गरजू विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण, गणवेश,वह्या, पुस्तके ,भोजन सर्व मोफत असून या शाळेचा शिक्षणचा दर्जा अत्यंत चांगला अाहे. सलग चार वेळा एस. एस. सी. चा १००% निकाल लागला असून येथील प्रथम क्रमांकाचा विध्यार्थी ९०% च्या पुढे आहेत.
गौतमराव खरात हे सातत्याने या शाळेकडे लक्ष ठेऊन आहेत. दरवर्षी ते युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. त्यामध्ये त्यांनी या शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले आहे तर शाळेच्या दर्शनी भागात संविधान दिनाच्या दिवशी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधानाची प्रस्ताविका. रुपये १५०००/- च्या खर्चाने अत्यंत सुंदर बसविण्यात आली आहे. सुरुवातीला प्रयोगशाळेत साहित्य नव्हते. त्यावेळेस युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जवळ जवळ २८०००/- रुपये किमतीचे साहित्य देऊन आपल्या विध्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचण येऊ नये. ही भावना मनांत ठेऊन कार्य करीत आहेत.
आजही मागासवर्गीय विध्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून, मुला/मुलींसाठी, वसतिगृह मिळविण्यासाठी
सरकार दरबारी हेलपाटे मारत आहेत.
आंबेगाव तालुक्यात अनु.जाती व नवबौद्ध समाजाला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत १९८५ पासून आरक्षण नाही. या साठी निवडणूक आयोगाकडे व शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. मग जनगणना असेल तर ती कशी चुकीची आहे? हे तत्कालीन विभागीय आयुक्त मा. चोकलिंगम साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन समाजाला न्याय मिळविण्याचा प्रयत्न सतत करीत आहेत.
गौतम खरात यांनी सर्वसामांन्याना बरोबर घेऊन आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यापासुन तर पूर्व पट्ट्या पर्यन्त दौरे करून, मोठा जनसंपर्क तयार करून युवक युवतीचे संघटन तयार केले आहे .
अनेक राज्य शासनाच्या योजना त्यांनी आंबेगाव तालुक्यात राबविण्याचा प्रयत्न केला असून त्या यशस्वी झाल्या आहेत. त्या मध्ये नव्याने आलेली डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजविकास योजनाच्या माध्यमातून ना . वळसे पाटील यांच्या माध्यमातून सन. २०१९ -२०. या वर्षात तालुक्यात १ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी समाजासाठी मिळविला. तर या वर्षी जवळ जवळ ८० लक्ष रुपये निधी प्राप्त झाला. यामुळे मागासवर्गीय समाजाचा नक्कीच विकास होणार आहे. अशाच अनेक योजना ते समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात. त्या मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी स्वधार योजना, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना
मागासवर्गीय बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, महात्मा फुले महामंडळ ,अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या सुशिक्षित बेरोजगरासाठीच्या योजना अशा अनेक राज्य शासनाच्या योजना. त्यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत व त्या राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असताना, ज्या महाराष्ट्रात पुरोगामी विचार आहेत. त्या फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचे कामही खरात युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून करीत आहेत. दर वर्षी तालुक्याच्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्यदिव्य साजरी करतात. तसेच अनेक विचारवंतांना आमंत्रित करून पुरोगामी विचारांची पेरणी करीत आहेत. त्यामध्ये प्रा . दि. बा. बागुल सर, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, जेष्ठ विचारवंत हरी नरके, प्रा. मिलींद कसबे, शिवव्याख्याते प्रा. अशोक बांगर सर, प्रा संपत गरगोटे यशवंत गोसावी, डॉ. हनुमंत भवारी सर आदी अनेक विचारवंतांची व्याख्याने आयोजित करून लोकांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच १४ एप्रिलला जयंती भव्यदिव्य मिरवणूक, आकर्षक देखावे असतात तर अनेक नामवंत गायक आणून भीमगीते सादर करून डॉ . बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तर दरवर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना " आंबेगाव भूषण " या नावाने पुरस्कार देऊन युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या वतीने सन्मान केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मा. अभिमन्यू काळे साहेब, गृह विभागाचे उपसचिव मा. कैलास गायकवाड,सिद्धीविण्याक ट्रस्ट चे कार्यकर्ते संचालक मा. सजीव सैद पाटील, महाराष्ट्र टाईम्सच्या संपादिका मा. प्रगतीताई बाणखेले, पोलीस खात्यात उच्च पदावर असलेले प्रवीण पडवळ साहेब , महाराष्ट्र कब्बडी संघाचा कर्णधार व घोडेगाव नगरीचे सुपुत्र विकास काळे, खो खो खेळत अनेक सुवर्ण पदक मिळविणारी रांजणी गावची कन्या, काजल भोर. जेष्ठ पत्रकार संतोष वळसे, झी 24 तासचे साईदीप ढोबळे, जेष्ठ गीतकार गायक प्रभाकर पोखरकर, सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी, नाट्यदिगदर्शक संजय कसबेकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने कार्य करणारे दिवंगत आर. जी. खरात यांचे सुपूत्र व रिपब्लिकन पक्ष (गवई गट) चे मुंबई अध्यक्ष आनंदराव खरात. शिक्षण क्षेत्रात व्याख्याते डाॅ. हनुमंत भवारी सर लेखक श्री. मनोहर मोहरे. तमाशा
कलावंत बाबुराव गुंजाळ अशा अनेक भूमीपुत्रांचा सन्मानकरून समाजापुढे आदर्श ठेवण्याचे व पुढील पिढीने त्यांची प्रेरणा घेऊन, तालुक्याचे नाव उज्वल करावे हाच खरा हेतू या मागचा आहे.
युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती, साजरी करून निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेऊन अण्णांभाऊ चे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या वयीने केले जाते. तर दरवर्षी २६ नोव्हेंबरला युगप्रवर्तकच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन केले जाते. ते संपूर्ण घोडेगाव शहरात रॅली काढून संविधान विषयी जागृती निर्माण करीत असतात. तर संविधान दिनाचे निमित्त दरवर्षी १०० लोकांना राज्यघटनेच्या प्रती बार्टी संस्थेकडुन अल्पदरात मिळवून नागरिकांना वाटप करीत असतात. संविधानाचा विध्यार्थ्यांना अभ्यास व्हावा म्हणून, निबंध स्पर्धेचे आयोजन करतात. तर संविधानाचे बाबतीत शाळेमधून परीक्षा घेऊन शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व अभ्यास घडविण्याचे काम दरवर्षी करतात.
एव्हढेच नाहीतर युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ६ डिसेम्बर या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारीनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य शिबीर,रुग्णांना फळं वाटप करून गरीब व गरजू लोकांसाठी रुग्ण कल्याण समितीला ५,५५५/-रुपये देऊन ग्रामीण रुग्णालयाला मदत करीत आहेत.
जानेवारी महिन्याच्या ३ तारखेला युगप्रवर्तकच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील आदर्श महिलांना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. तर विविध गुणवंत विध्यर्थीनींना प्रमाणपत्र दिले जाते. क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या जीवणावर निबंध स्पर्धा घेऊन, सावित्रीबाई च्या इतिहासाला उजाळा दिला जातो. त्यामध्ये एकपात्री प्रयोग, व्याख्यान आयोजित केले जातात . यामध्ये आता पर्यंत तालुक्यातील अत्यंत प्रभावी काम करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श महिला पुरस्कार दिले आहेत. यात १९५५ पासून वर्तमान पत्रांची कात्रणं गोळा करून अनेक पुस्तक बनविणाऱ्या ८५ वर्षीय आजीबाई पर्वताबाई विरणक,एल. आय. सी. मध्ये ग्रामीण भागातून उंच भरारी मारणाऱ्या सौ. साधनाताई सैद असतील किंवा अडथळ्याची शर्यत म्हणून ज्यांनी देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या श्रीम सरस्वतीबाई साबळे असतील आशा अनेक महिलाना सन्मानित करून त्यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा असे कार्य करीत आहेत.
हे सर्व करीत असताना तालुक्यात ,राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला तर मोर्चे आंदोलन,धरणे आंदोलन ,उपोषण रास्तारोको या सारख्या लोकशाही मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या मध्ये खैरलांजी प्रकरण,जवखेडे हत्याकांड तालुक्यातील विविध मागण्यासाठी केलेले धरणे आंदोलन असो की, भीमकोरेगावच्या हल्ल्याबाबत केलेला मंचर घोडेगाव येथील रस्ता रोको असो. अत्यंत आक्रमकपणे न्याय शासनाकडे मागितला आहे. त्याचे हेही रूप तालुक्याने पाहिले आहे.
मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील मंत्री कामगार व उत्पादन शुल्क म. राज्य यांचे कट्टर समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण तालुजक्याला ओळख आहे.
ते मा. ना. वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे आयोजन करून तालुक्यातील तहसीलदार,गटविकास अधिकारी पोलीस अधिकारी,कृधी अधिकारी असे तालुक्यातील सर्व अधिकारी व मागासवर्गीय जनता एकत्र बसून समस्या जनता व अधिकरी यांचे मध्ये आमने सामने सुसंवाद घडवून आणून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अधिकारी आणि सामान्य जनता यातील सुसंवाद साधला जाउन सामान्य माणसाच्या मनांतील भीती ही। निघून जावी व स्वतःच्या कामासाठी सामान्य माणस निर्भीड पणे आपल्या समस्या अधिकाऱ्यांना सांगून सोडवू शकतील हा खरा उद्देश त्या मागचाआहे .
अशी अनेक कामे गौतमराव लोकांमध्ये जाऊन करतात ,अधिकाऱ्यांशी कधीही उद्धट वर्तन नाही. नेहमी अधिकाऱ्यांकडून सामान्य माणसाचे काम अदबीने करून घेणारे प्रशासनावर पकड असणारे , अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे गौतमराव खरात. शांत,संयमी,प्रशासकीय ज्ञान असलेला एक युवक
आंबेगावच्या अतिदुर्गम अशा 'दिगद ' या लहानशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला, घरची परिस्थिती बेताची असलेला. मूळ हाडामांसाचा एक सगळ्यांना हवा वाटणारा भारुड कलाकार . ज्याच्या आवाजात जादू अाहे. त्याच्या कलेच्या माध्यमातून आम्ही त्या काळातली लहान पोर, त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडलो होतो.
त्यांच्या आणि माझ्या गावात फक्त घोडनदीच मध्ये आहे. त्यामुळे या व्यक्तीमत्वाच्या आम्ही लहानपणापासून ते आता पर्यंतच्या सामाजिक व राजकीय प्रवासाचे साक्षीदार आहोत. सहज लॉकडाऊनमुळे घरींच असल्यामुळे या गावाकडच्या संवगड्या विषयी लिहावं. म्हणून लिहीत बसलो. खूप काही लिहिण्यासारखे आहे पण या समाजाला दिशा देणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा एक आंबेगाव तालुक्यातही नेता कोण असेल! तर या महापुरुषांच्या विचारांची पेरणी करणारा विधायकवृत्तीचा युवक म्हणजे ........गौतमराव खरात
!!शब्दांकन!!
प्रा. डाॅ. हनुमंत लक्ष्मण भवारी
(M.A. B.Ed ,NET, M. Phil. Ph. D)
श्री. पद्ममणि जैन महाविद्यालय, पाबळ.
ता. शिरूर जि. पुणे