नागपूर : अरूण कराळे
विदर्भ माध्यामिक शिक्षक संघाने मार्च २०२० ची वेतन देयक स्विकारण्यासाठीचा शासन निर्णय दि. १ एप्रिल २०२० यातील मुद्दा क्रमांक ७ यात कर्मचारी यांचा अ,ब,क व ड यापैकी गट ठरवितांना कर्मचारी यांच्या वेतनश्रेणीचा विचार करण्यात येवु नये असे स्पष्ट केलेले आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व मुख्याध्यापक यांचे वेतन ७५ टक्के काढणे योग्य ठरविले होते.
कोषागार अधिकारी नागपुर यांनी सामान्य प्रशासन,शासन निर्णय,दि.२७ मे.२०१६ यात अ,ब,क व ड गट ठरवितांना वेतनश्रेण्याचा आधार घेत,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व मुख्याध्यापक वेतन ५० टक्के काढण्यावर भर देवुन आक्षेप लावुन देयके परतीत दाखविली होती. अधिक्षक वेतनपथक नागपुर यांची ठाम व नियमाला अनुसरून असलेली भुमिका यामुळे त्यांनी ही देयके कोषागार कार्यालयातच राहु दिली होती.
विमाशि संघाचे शिक्षण उपसंचालक,नागपुर यांचे सोबत प्रमोद रेवतकर,विठ्ठल जुनघरे,संजय वारकर,अनिल गोतमारे,रमेश काकडे ,अविनाश बडे,तेजराज राजुकर,प्रमोद अंधारे,अरूण कराळे,राकेश दुम्पलवार,मधुकर भोयर यांनी संपर्क करुन दोन्ही कार्यालयाची भुमिका व नागपुर विभागातील इतर सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व मुख्याध्यापक यांना क गटात मान्य करून वेतन देयक पारित केलेली आहे,हे स्पष्ट केले.
विमाशि संघाने दि.९ एप्रिल पासुन वेतन देयकाची प्रत प्रत्यक्ष न मागविता ईमेल वर ऑन लाईन मागण्यासाठी नागपुर विभागातील सर्व जिल्ह्यातील अधिक्षक वेतनपथक यांना सुचित करण्यासाठी विनंती करण्यात आली.अधिक्षक वेतन पथक यांनी त्याप्रमाणे सुचना प्रसिदध केलेल्या आहे.
विमाशि संघास शनिवार १८ एप्रिल रोजी कोषागार अधिकारी,नागपुर यांचेकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सोमवार २० एप्रिल रोजी ईएफटी मिळणार असुन,नागपुर जिल्ह्यातील वेतनाचा प्रश्न निकाली निघुन मंगळवार २१ किंवा बुधवार २२ एप्रिल रोजी शिक्षकांचे खात्यात होण्याची जमा होण्याची शक्यता आहे.प्राथमिक विभागाची देयके सोमवार २० एप्रिल रोजी जमा होतील.अशी माहीती विमाशी संघाचे नागपूर शहर सचिव प्रमोद रेवतकर यांनी दिली.