Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २५, २०२०

शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना मिळणार थकित वेतन


आमदार किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिका-यांशी चर्चा
चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोरोना विरोधातील लढ्यात चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात चतुर्थ क्षेणी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या कर्मचा-यांचीही भूमीका महत्वाची आहे. जिवाची बाजी लावून हे कर्मचारी देशसेवा करत आहे. अशात त्यांना त्यांचे थकीत वेतन मिळावे म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खनिज विकास निधीतील पैसे प्रशासनाला दिले आहे. असे असले तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे या कर्मचा-यांच्या हातात अद्यापही त्यांच्या हक्काच्या वेतनाचे पैसे पडलेले नाही. 

हे योग्य नसून अन्यायकारक आहे. अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाच्या कामावर आपली नाराजी व्यक्त करत या कर्मचा-यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्यात जिल्हाधिकारी यांनीही यावर कारवाही करत या कर्मचा-यांना तिन महिण्याचे थकीत वेतन देण्याचा आदेश पारीत केला आहे. त्यामूळे आता या कर्मचा-यांना लवकर त्यांचे थकीत वेतन मिळणार आहे. आज विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना अनेक महत्वाच्या सुचना केल्यात.

सध्या देशासह चंद्रपूरातही कोरोनाशी लढा सुरु आहे. या लढ्यात स्वत:च्या जिवाची परवा न करता आरोग्य कर्मचारी देशसेवा करत आहे. यात चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काम करत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भूमीकाही मोठी आहे. मात्र या कर्मचा-यांचे वेतन मागणी अनेक महिण्यांपासून थकीत ठेवण्यात आले आहे. या विरोधात नगरसेवक पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात या कर्मचा-यांकडून वारंवार आंदोलने केल्या गेली आहे. या आंदोलनाची दखल घेत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास, मदत व पूनर्वसन, तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या कर्मचा-यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याकरिता खनिज विकास निधीतील पैसेही वळते करण्यात आले आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमूळे अद्यापतरी या कर्मचा-यांना वेतन मिळालेले नाही. 

दरम्याण आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याशी बैठक करत या कर्मचा-यांची कोरोना विरोधातील सेवा लक्षात घेता त्यांचे थकीत वेतन देण्यात होत असलेली दिरंगाई दुर करुन पालकमंत्री यांच्या निर्देशासूनार या कर्मचा-यांना तात्काळ वेदन देण्यात यावे अशा सूचना केल्यात तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी या कर्मचा-यांचे तीन महिण्यांचे थकीत वेतन लवकर दिल्या जाणार असे आश्वासन दिले असून तसा आदेशही त्यांच्यावतीने संबधीत विभागाला देण्यात आला आहे. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी या कर्मचा-यांच्या वेतन प्रक्रियेत होत असलेल्या प्रशासकीय दिरंगाईबाबत चांगलीच नाराजी व्यक्त केली. 

यावेळी आ. जोरगेवार मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा केली जिल्हा बाहेरुन येणा-या नागरिकांची सखोल चौकशी व योग्य ती तपासणी करुनच त्यांना जिल्हात प्रवेश द्या अशाही सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणारी यांना केल्यात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.