Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

चंद्रपुर लोकसभा क्षेत्रात दररोज 5 हजार गरजूंना भोजन:कोणीही गरजू उपाशी पोटी झोपता काम नये:खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर /प्रतिनिधी:
 राज्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरजूना उपाशीपोटी दिवस काढावे लागू नये म्हणून लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,वणी, घाटंजी येथील पाच हजार गरजूना भोजन वितरित करण्यात आले.

दररोज 05 हजार गरजुना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात येत आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना, धानोरकर दाम्पत्याने गरजू व गोरगरीब अडकलेले मजूर यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याचे आवाहन केले होते व चार दिवसांपासून चालू केलेल्या या उपक्रमास दिवसेदिवस वाढते गरजु पाहता दररोज 5 हजार जेवणाचे पॉकेट पुरवण्याचे संकल्प खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे.

यात वरोरा तालुक्यात राजू महाजन, राजू चीकटे, गजानन मेश्राम, सुभाष दांडले तर भद्रावती येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रफ्फुल चटकी ,विनोद वानखेडे,व सर्व नगरसेवक ,वणी येथे माजी आमदार कासावार साहेब यांच्या नेतृत्वात विवेक मांडवकर ,ओम ठाकूर ,राजू मालेकर , प्रमोद निकुरे, घाटजी आर्णी येथे आरीज बेग, पालाश बोढे, निखिल देठे ,राजुरा येथे अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनात तर बल्लारशाह व चंद्रपूर येथे रामू तीवारी,गोपाल अमृतकर संतोष लहमगे, करीम भाई ,घनश्याम मूलचनदानी अशोक मत्ते या सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजुना जेवणाची पॉकेट पोहचवण्यासाठी परिश्रम घेत आहे. कोणीही गरजू भुकेल्या पोटी झोपता काम नये याची काळजी घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.