नागपूर : अरूण कराळे:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार बंदी लागू केल्यानंतर शहरात संचार बंदी कायद्याचे पालन होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या पोलिस ठाण्यात कडक कारवाई करण्यात येत आहे.तसेच राज्यात संचार बंदी कायदा लागू झाल्यानंतर जिल्हा सिल करण्याचा आदेश मुख्यमंत्री यांनी केला आहे. वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत नागरीकांनी संचार बंदी कायद्याला प्रतिसाद दिला आहे.
दिवसभर नागरीकांनी घरी राहून शासनाच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. प्रत्येक गरजुनी परवानगीकरिता पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने नागरीकांची ठाण्यात झुंबड उसडली होती.नागरीकांची आवश्यकता पडताळून पास देण्यात येत होती. त्यात प्रामुख्याने रुग्णालयात उपचाराकरिता,किराणा,धान्य भंडार दूकान,भाजीपाला खरेदी-विक्री,औषध वाटप,पाणी पुरवठा करणारे,डेली नीड्स तसेच अत्याआवश्यक असणाऱ्या कामालाच प्राधान्य देवून परवानगी देण्यात आली.
दररोज किमान ३५० ते ४०० परवानगी पासेस वाडी पोलीस स्टेशन स्टेशन वाडी पोलीस स्टेशन येथून देण्यात येत आहे. वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक दुय्यम पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात गोपनीय विभागाचे हवालदार संजय गायकवाड,नितीन पोयम परवानगी पासेस वितरित करीत आहे.