हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पोलिसांना मास्क,
सॅनिटायझर,गलब्ज वाटप
नागपूर : अरूण कराळे:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर आलेल्या कोरोना विषाणु रोगाचे पसरलेले सावट कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी २१ दिवसाचा देशात कर्फ्यू लागू केल्यापासून पोलीस विभागावर फार मोठी जबाबदारी आल्याने आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून देशसेवा करीत आहे,त्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान आमदार समीर मेघे यांनी केले.
सामाजिक बांधिलकी व कर्तव्याची जाणीव ठेवत हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी पुढाकार घेत विधानसभा अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन हिंगणा,एमआयडीसी,वाडी तसेच एमआयडीसी वाहतूक शाखेतील समस्त पोलिसांना राष्ट्रीय कार्य पार पाडताना कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून एमआयडीसी विभागाचे सहा पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांचे मार्फत मास्क,गलब्ज तसेच सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे,एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे,वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव,वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक,खडगांवचे माजी सरपंच देवराव कडू,पुरुषोत्तम लिचडे,विजय गंथाळे प्रामुख्याने उपस्थित होते.