Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ३०, २०२०

सायगाव मॉर्निंग ग्रुपच्या वतीने एक हात मदतीचा जपली सामाजिक बांधिलकी..!




येवला प्रतिनिधी: - विजय खैरनार
येवला: तालुक्यातील सायगाव येतील कोरोना विषाणू ने जगातील सर्वच देशामधे मृत्यूचे तांडव केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर भारतातही या कोरोना ने थैमान घातले आहे त्यामुळे सम्पूर्ण भारत लॉक डाऊन आहे त्याच बरोबर महाराष्ट्र दिल्लीला बंद असुम संचारबंदी व कलम 144 लागू आहे त्यामुळं कुठेही जात येता येत नाही म्हणून जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सर्व रोजगार ठप्प आहे सर्व शासन व्यवस्था आज कोरोना विषाणू ला हरवण्यासाठी सज्ज झाली आहे परंतु जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते म्हणूनच येवला तालुक्यातील सायगाव गावातील होतकरू तरुणांनी गोरगरीब मजूर ,ज्यांची आर्थिक सुबत्ता कमावणारे कुणी नाही अशा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू म्हणून तांदूळ तेल मीठ आणि भाजी पाला वाटप करण्यात आला आहे. पहिले महादेववडी येथून झाली संपत आव्हाड या व्यक्तीला जीवनावश्यक वस्तू तांदूळ व इतर सामग्री देताना त्या कुटुंबाला दोन ते तीन दिवसापासून तेल नव्हतं परिस्थिती भयाण आहे याचं वास्तव चित्रण मॉर्निंग ग्रुप ने बघितलं अक्षरशः त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा आनंद बघण्यासारखा होता सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेला हा मदतीचा हात पर प्रांतीय शेधवा येथून आलेले मजूर यांनाही जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आलं यावेळी त्यांच्या व्यथा सांगताना ते म्हणाले परगावी आलो पण कोरोना मुळ घरी जात येत नाही असं सांगितलं हाताला काम पण नाही. त्यामुळं कुटुंब कस चालावं हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे मॉर्निंग ग्रुप च्या मदतीने ज्यांचं कमावणारे कुणी नाही. अशा 40 कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या या वेळी मॉर्निंग ग्रुपचे प्रमुख सदस्य शाहरुख शेख , विक्रम देशमुख , मयूर खैरनार , दिपक खैरनार , अरुण जानराव , प्राध्या देवरे , वैभव खैरनार , हर्षल देशमुख , सिकंदर शेख , समीर पठारे , प्रशांत साबळे , सागर साबळे , सचिन वालतुरे , विजय उशीर , नवनाथ उशीर , गुलाब उशीर , कांतीलाल सोनवणे.
या सर्वांनी प्रमुख सहकार्य केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.