आप आणि मनसेनेच्या प्रयत्नाने परतले चंद्रपुरात
झाली राहणायची व जेवण्याची व्यवस्था
ललित लांजेवार/चंद्रपुर:
देशात सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी असतांना गाव सोडून बाहेर कामानिमित्य आलेल्या लाखो लोकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला, लाखो मजूरांचे स्थलांतरण होऊ लागले.अनेक ठिकाणी मजूर कामाचे ठिकाण सोडून आपल्या मुळ गावी जाऊ लागले,तर कुठे विध्यार्थी आपले अर्धे शिक्षण सोडून गावाकडे परतू लागले.
असाच काहीसा प्रकार चंद्रपूर येथे रविवारी घडला,चंद्रपूर येथे एका कावेरी इंटरप्राईजेस कंपनीत ट्रेनिंगसाठी आलेल्या २२० मुलांपैकी काही मुलांनी गावाकडे पायदळ जाण्याचे धाडस केले.हि मुले तामिळनाडू व विविध ठिकानाहून चंद्रपुरात ट्रेनिंगसाठी आली होती.देशात संचारबंदी लागू झाली अन खाण्याचे वांदे होऊ लागल्याने गावाला जाने भाग पडले.व अश्या परीस्थित यातील २१ मुलांनी चंद्रपूर ते मद्रास (चेन्नई)पायदळ जाण्याचा निर्णय घेतला व ते चंद्रपूर वरून बायपास मार्गे तेलंगणाच्या दिशेने निघाले .
हा प्रकार आम आदमी पार्टीचे पदाधिकार्यांना दिसला. रविवारी दुपारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी अष्टभुजा वार्ड येथे गरीब मजदूर बेसहारा नागरिकांना जेवण पोहोचविण्यासाठी गेले असता रस्त्यावर २०-२२ मुले आपला बोरिया बिस्तर घेऊन पायदळ गावाकडे निघाल्याचे समजताच त्यांनी त्यांची विचारपूस केली.अश्यातच हि बाब मनसेचे वाहतुक सेनेला माहित होताच मनसेचे वाहतुक सेना प्रमुख भरत गुप्ता व महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर त्याठिकाणी पोहोचल्या व त्यांची आप व मनसेकडून विचारपूस करण्यात आली.त्यांनी सांगितले कि ते तीन महिन्यापासून सिस्टर कॉलनी परिसरात ट्रेनिंगला होते.
त्यांना त्यांच्या कंपनीने घरी जायला सांगितले . हकीकत ऐकून आप आणि मनसेच्या पदाधिकारयांनी विद्यार्थ्यांना रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले
व फोन करून जिल्हाधिकारी,तहसीलदार,यांना या बाबद माहिती दिली. तसेच ट्रेनिंगचे इन्चार्ज रेड्डी यांना पण पोलीस स्टेशन येथे फोन करून बोलावण्यात आले .रेड्डी यांनी आधी असमाधानकारक उत्तर दिल्याने राजकारण्यांची डोक्यात गेली अन रेड्डी यांना तुम्हाला यांच्या राहण्याची व्यवस्था करावीच लागेल असे सांगितले.
दबावात आल्याने रेड्डीने सर्व अटी मंजूर केल्या व त्यांची राहण्याची सोय करण्यात आली तर चंद्रपुरातील काही दात्यांनी त्यांच्या जेवणाची सोय केली.सर्व कारवाई दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना केळ,पाणी बॉटल,देण्यात आले व शहरातील सिस्टर कॉलनी येथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली.
या वेळी संबंधित कंपनीकडून काही धमकी किव्हा त्रास झाल्यास आप आणि मनसेला फोन करा असे देखील सांगितले व तसे पदाधिकाऱ्यांचे नंबर देखील विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी,तहसीलदार,रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनसे वाहतूक सेनेचे भरत गुप्ता , महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर तर आपचे चंद्रपूर अध्यक्ष सुनील मुसळे,भिवराज सोनी,बबन क्रीश्नपल्लीवार,संदीप पिंपळकर,दिलिप तेलंग,आदींनी विद्यार्थ्यांना कठीण प्रसंगी मदत केल्याने विद्यार्थ्यांनी यांचे आभार मानले.