Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २७, २०२०

कोरोनापाठोपाठ अवकाळीचे ढग डोक्यावर हाताशी आलेला घास पावसाने हिरावला



शेतकरी संकटात शेतमालाचे भावही कोसळले ग्रामीण भागावर अवकाळी संकट..!

येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील गारखेड़ा उत्तर पूर्व भागातील व तालुक्यातील कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाच्या किमती कोसळल्या आहेत पावसाचे ढग डोक्यावर आल्याने येवला तालुक्यातील फळबागा भाजीपाला कांदा ,गहू ,मका उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत तालुक्यात गुरुवारी रात्री पहाटे चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे.

कोरोणामुळे कांदे डाळींब गहू हरभरा द्रांक्षे भाजीपाल्याचे भाव पडले आहेत शेतीमाल कसा आणि कुठे ठेवावा असा प्रश्न समोर असताना अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे गुरुवारी ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात वारा सुटल्याने कांदे, मका ,हरभरा तसेच काढ़नीस आलेल्या गहु चे देखील मोठे प्रमाणात नुकसान झाले शेतात काढणीस आलेला गहु ला हार्वेस्टिंग मशीन ही मिळत नाही त्यामुळे गव्हाचे काय करायचे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहेत गारखेडा अंगुलगाव तळवाडे राजापूर ममदापुर सुरेगाव गंवडगाव परिसरात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची भीती आहे शासनाने संचारबंदी लागू केली त्यामुळे वाहनचालक शेतीमाल बाजार समितीत घेऊन जात नाहीत त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे शेतात काढून ठेवलेला विक्री योग कांदा भिजला असतानाच काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे.
गुरुवारी (दि. 26 ) रात्री पाहटच्या तीन च्या सुमारास तालुक्यात ठीक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्याने विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे दोन तास पाऊस पडत होता या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: कांदे गहु मका हरभरा आणि भाजीपाला या पिंकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदे ही वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले आहेत कांदे आणि गहु मका पिंकांचे मोठे प्रमाणात नुकसान आहे कारण सर्वच ठिकाणी गव्हाचे पीक काढणीला आली होती अनेक शेतकऱ्यांचा गहु भिजला गेला आहे जोराच्या वार्‍यामुळे काढणीस आलेल्या गहू पूर्णपणे शेतात झोपल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे त्याचप्रमाणे डाळिंब फळे खाली पडल्यामुळे ग्रामीण भागात नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहेत एकीकडे कोरण्याची दहशत तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे सध्या कोरोनाच्या भीतीने मंजूर ही कामला नकार देत आहे गारखेड़ा परिसरात अजुन ही गहु हरबरा मळनीची कामे सुरु आहे
काढणीच्या अगोदरही मागील वीस दिवसांपूर्वी आज झालेल्या पावसाच्या सरीने मालाची प्रतवारी घटणार आहे तसेच मूळ रंग बदलेल त्यामुळे भाव कमी मिळेल अशी व्यथा विजय खैरनार यांनी सांगितले उत्तरपूर्व भागात लागवडी खालील कांदे चे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहेत त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल होऊन बेजार झाला आहे.

"आमच्या शेतात जास्त प्रमाणात हे कांद्याचे पीक घेत असतो पन या वादळी आवकाळी पाउसामुळे यंदा खुप प्रमाणात नुकसान झाले आहे या वर्षी वजनात आणि दरात पण घट ही होणार आहे त्यामुळे मोठे नुकसान सहन करावा लागणार आहे".
- इंजि. विजय खैरनार , गारखेड़ा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.