✍🏻 अनुराधा हवालदार
"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे.मात्र हे तर अद्भुत शक्तीचं प्रदर्शन आहे.एक सुक्ष्म जीव जो डोळ्यांनी दिसतही नाही पण किती ही त्याची दहशत.आहे नं गंमत?भला मोठ्या महाकाय राक्षसाची भिती वाटणं सहाजिक पण एवढ्याश्या जीवाने हादरवून टाकलय अख्ख्या जगाला.अनेक समृद्ध देश सुद्धा नमलेत,हरलेत या अद्भुत शक्ती पुढे. यामुळे हेच सिद्ध होतं की संपूर्ण ब्रम्हांडाचं चक्र चालविणारी एक प्रचंड शक्तीशाली शक्ती कुठेतरी आहे.आपल्या मानवजातीला हे मानावेच लागणार आहे.आपल्या जीवनात अशा अनेक परिस्थिती,प्रसंग, जे मनाविरुद्ध येतच राहतात,तेव्हा पटतं आपण हतबल आहोत.आपल्या हातात काही नाही अशी जाणीव होते.इथे आपलं काहीच चालणार नाही.तेव्हा या शक्तीचा अनुभव येतो.तेव्हा पटतं कुणीतरी वर बसून हे सगळं ऑपरेट करतोय.सगळं बँलेन्स करतोय ,हिशोब ठेवतोय,याची पदोपदी जाणीव होते.आपण फक्त कठपुतल्या आहोत त्याच्या हातातल्या....म्हणून तर त्या शक्तीवरच्या श्रद्धेपोटी त्या अपार शक्तीला देव मानून पुजतो.शेवटी सगळ्या आशा तिथेच येऊन थांबतात.
जगभर कोरोनामुळे हाहाकार माजलाय.आपल्या दैनंदिन जीवनावर याचा किती मोठा परिणाम झालाय हे आपण सगळेच अनुभवतोय.अनेक नियमांनी बांधल्या गेलोय सगळेच,ज्याची कधी सवयच नव्हती.घरात बसायची सवय नसणारे घरात कैद झालेत.सवय तुटली होती पण गृहिणींना सगळी कामं घरी करावी लागतात आहेत.मुलांना खेळाण्यावर बंदी आलीय.ऑफिस, दुकानं,समारंभ हॉल,थिएटर,शाळा,कॉलेज सगळ्यांना टाळे लागलेय.पर्यायच नाही दुसरा.न भुतो न भविष्यती अशी गती झालीय.बाहेर जाण्यासाठी तडफडतोय.पण जाऊ शकत नाही.उठसूट गाड्या घेतल्या की चाललो,कामासाठी ठीक पण बिनकामाचं पण उगाच भटकायचं.परंतु हा कोरोना रोग येण्याआधी आपण आजवर कसे मनाप्रमाणे स्वच्छंद वागत होतो.वाट्टेल ते करणे,वाट्टेल तिथे हिंडणे फिरणे खाणे...काय काय करत आलोय.मन मानेल तसं वागत आलोय.सुखचैनींच्या हव्यासापोटी माणूसकीला सुद्धा टांगलं खुंटीला.आपल्यातला ओलावा सुकलाय,माया आटलीय,आदरभाव हरवलाय,दया तर हद्दपारच झालीय.भितीची भितीच नाही उरली.दूर पळालीय सोडून ती.बिनधास्त झालोय.हमारा कोई कुछ नहीं बिगाड सकता...ही अहंभावपणाची भावना रुजलीय फळफळलीय मनात.
आज आपण कोरोनाचा सामना करतोय.सगळं बंद झालय.खाणं पिणं उठणं बसणं फिरणं हिंडणं सगळ्यावर नियंत्रण आलय.कर्मांची फळच म्हणू याला.आधीचे लोक सांगत असत शिस्त पाळा,निमयन करा,पण एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून दिल्या त्या मोलाच्या गोष्टी.थकले तेही शिकवून.
मांसाहार व्यसनं व्यभिचार गुन्हेगारी बोकाळलीय जागोजागी. वाढतच चाललय.मुक्या प्राण्यांना मारून ते मांस शिजवून खाण्यात कसला आलाय बहादूरपणा?मुकेच ते आवाज थोडीच उठवणार..पण त्या जीवाचा शाप एकवटूनच आलाय आज...कोरोनाच्या रुपानं... बहाणाच हवा असतो.सो कॉल्ड पार्टीजचा..ही संस्कृती आहे का आपली..तो करतो मग मी पण का नाही.. भूषण मानलं जातं..माकडचाळे करणारी माकडच जणू...माज आलाय..मी काय आहे, माझं काय वाकडं होणार...मगरुरीची नशा चढलीय.पण निघणार हा माज बाहेर..सुतसमेत.. कोरोनाचा व्हायरस किंवा इतर रोग म्हणा, हा बहाणा असतो..बदला घेण्याचा...उपरवाले की लाठी में आवाज नहीं होती...जब पडती है तो...अच्छे अच्छों को रुलाती है भाऊ...खरच तपासून बघा स्वतःची लाईफस्टाईल...माना की नका मानू...हे सगळं विधीलिखीत असणारच... आहेच.....कलियुगातल्या या उद्दाम उन्मत्त झालेल्या मानवाला धडा शिकवण्यासाठी,दैवी शक्तीचा प्रकोप आहे हा.मानवाला त्याची चुक कळण्याकरिता हा व्हायरस चा कहर,किंवा आणखी कुठलं नैसर्गिक संकट अधूनमधून येतं आणि माणसाच्या आयुष्यात उलथापालथ माजवून जातं.धडा शिकविण्यासाठी.. डोळे उघडण्यासाठी. पण हे कितपत कळतं .देवासच ठाऊक..ही मानवाशी दैवीशक्तीची लढाई आहे.त्याच्या शक्तीपुढे हतबल आहोत आपण.निसर्ग की एक मार ....बहोत भारी पडती है बंदे ।निसर्गाने प्रदान केलेली ही सुंदर जीवस्रुष्टी,उपभोगण्यासाठीच आहे.निरागसपणे, निर्मोही प्रवृत्तीने तिचा आनंद जरूर लुटावा.मात्र हळूहळू प्रगतीच्या नावाखाली र्हास केला पृथ्वीचा.सडवली गंजवली तिला,आतून पोखरून काढली.बिचारी थकली आणि घाम फुटून ग्लोबल वार्मिंग मुळे वितळायला लागलीय.किती रे माणसा तु व्दाड, भयंकर व्हायरससारखा या पृथ्वीला चिकटलाय आणि रोगट करुन टाकलस तिला.ऐहिक सुखांच्या नादात मृगजळापाठी धावणारा, पळणारा माणूस कुठे येऊन पोहोचलाय...त्या वेड्या कस्तुरीमृगासारखाच...तुझ्यातच वसणारा आनंद तु बाहेरच्या जगात शोधतोय?..त्यासाठी मागे काय काय सोडून दिलयस?...अनमोल असा काळ सुटत चाललय आणि एवढे करुन सुख सापडतच नाही... मरेस्तोवर....
मानवा आता कळले, खरच इतकं धावायची,पळायची,हावरटपणाची गरज होती का? जे होतं त्यात समाधान मानलं असतं तर आज चिंतामुक्त चिंतामणी झाला असतास.स्रुष्टीचा आदर करायला शिकावा,निसर्गाला चँलेंज देऊन कुठलेच धाडसी पाऊल उचलू नये,पर्यावरणाचा खेळ करुन प्रगती साधणे अधोगतीच ठरेल.वातावरणाला कुलषित करेल एवढी वैज्ञानिक प्रगती काय कामाची?खरच सुख मानलं तर झोपडीत पण मिळतं,नाहीतर बंगल्यातही तु बेचैन आणि चिंताक्रांतच मरशील.समजून घे...आपल्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारी एक अपार शक्ती कुठेतरी आहे.त्यामुळेच या जगाचा पसारा योग्य रितीने आवरल्या जातोय.म्हणून जे कराल ते भराल...हे कायम ध्यानात असायला हवय.बस एकच प्रार्थना त्या शक्तीला,आता मात्र लवकरात लवकर आम्हाला या कोरोनाच्या संकटातून मुक्त कर.परंतु शेवटी एक महत्त्वाचे की या वाईट परिस्थितीकडे चांगल्या दृष्टीने ही पहाता येतं.आज आपण जे घरात बसून अनुभवतोय,आपण कुटुंबिय एकत्र आलोय,जे आजवर अनुभवले नव्हते,नुसती घाई मरमर धावपळीत आजवर जगणं चाललं होतं ते स्थिरावलय,संथ झालय,कधी नव्हे ते,खरच हे ही मान्य करायला हवेय.कदाचित आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा अनुभव किती सुखद असतो.एकमेकांच्या काळजीने आपण किती तळमळतो,हेच दाखवून द्यायचे असेल त्या अद्भुत शक्तीला....शतशः प्रणाम.💐👍
💁🏻♀️अनुराधा हवालदार
नागपूर