जुन्नर /आनंद कांबळे
कोरोना विषाणू संदर्भात तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आमदार अतुल बेनके यांनी बैठक घेतली.
जुन्नर तालुक्यात पुणे, मुंबई इतर शहरे तसेच विदेशातून येणाऱ्या लोकांची माहिती घेण्याचं काम आशा वर्कर्स गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. या माहितीनुसार आरोग्य विभागास लोकांचे विलगीकरण करणे सोपे जात आहे.
संपुर्ण जुन्नर तालुक्यात बाहेरच्या ठिकाणांहून आलेल्या लोकांची संख्या हि तब्बल १२००० इतकी आहे. यातील लहान घर असणाऱ्या लोकांसाठी ओझर, लेण्याद्री याठिकाणी राहण्याची आणि खाण्याची स्वतंत्र कक्ष स्थापन करून करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रशासन आणि इतर विभाग मदत करत आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला . .
लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील यंत्रणेशी सतत संपर्कात आहेअसे ही बेनके यांनी सांगितले .
या कामात कुठलाही हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा होणार नाही याची दक्षता प्रशासन पातळीवर घेण्यात यावी अशा कडक सूचना यानिमित्ताने संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व परिस्थिती हाताळण्यास प्रशासन यंत्रणा सज्ज आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
आजच्या बैठकीत तहसीलदार हनुमंत कोळेकर , तालुका विकास अधिकारी विकास दांगट , आरोग्य अधिकारी तसेच इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.