Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २८, २०२०

धक्कादायक:नागपुरात कोरोना बाधितांची संख्या 10 वर:आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

कोरोना/करोना/करो ना (कविता)
नागपूर/प्रतिनिधी:

नागपुरात शनिवारी सकाळी आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी खामला परिसरातील 43 वर्षीय व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज सकाळी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने खळबळ उडाली.



यात एका 17 वर्षाच्या मुलीची चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी दिल्लीवरून नागपूर असा प्रवास त्यांनी केला होता. आणि त्यानंतर ते आपल्या दुकानात देखील बसले होते. यात त्यांचा अनेक लोकांशी देखील संपर्क आला होता. या व्यापाऱ्याचा ज्या लोकांसोबत संपर्क आला अशा तीस संशयित रुग्णांची चाचणी शुक्रवारी करण्यात आली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 वर गेलेली आहे.


तर विदर्भात एकूण 15 रुग्ण झाले आहेत. यातील यवतमाळचे 4 आणि गोंदियाचा 1 रुग्ण आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.