जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांनसाठी आता आनंदाची बातमी आहे,मोहुर्ली येथील मामा तलावात पर्यटकांना आता बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. ताडोबा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी बोटिंगचा ट्रायल घेतला. या बोटिंगचा आनंद लुटल्याची ६ (स्वयंचलित) बोट आणण्यात आल्या आहे, एका बोटमध्ये २ व्यक्तींना बोटिंग करता येणार आहे. यासाठी अर्ध्यातासाठी २०० रुपये प्रतिव्यक्ती शुल्क आकारला जाणार आहे. या बोटिंग प्रकल्पातून मिळणारी रक्कमेचा अर्धा वाटा हा मोहुर्ली इको-डेव्हलपमेंट कमिटीला जाणार आहे, याच सोबत बचाव पथकात १ रेक्यु बोट व गावातील ४ चांगल्या सुधृढ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे ताडोबा भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आणखी एक वेगळा आनंद ताडोबात घेता येणार आहे.
बऱ्याचवेळा वेळेवर सफारी मिळेल या आशेने अनेक पर्यटक मोहुर्ली गेटवर येत होते मात्र सफारी बुकिंग फुल असल्याने पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत होते. मात्र आता निराश न होता पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे, यावेळी उपवनपरिक्षेत्र अधिकारी बफर झोनचे गुरुप्रसाद,RFO मुन वनकर्मचारी केसकर,माजी सरपंच विलास शेंडे व खबरबात प्रतिनिधी सुलेमानबेग यांनी बोटिंग ट्रायलचा आनंद घेतला.या बोटिंगमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याच सोबत पर्यटनवाढीला बळ मिळणार आहे.
याआधी देखील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इरई जलाशयात वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी सायकलिंग पाठोपाठ बहुप्रतीक्षित बोटिंग सेवा सुरू केली होती, मात्र काही कारवास्तव हि बोटिंग बंद पडली,त्यानंतर आता परत मामा तलावात पर्यटकांना आता बोटिंगचा आनंद घेता येणार आहे.