येवला/ प्रतिनिधी
तालुक्यातील ममदापुर येथे विहिरीत पडलेल्या हरणाला ग्रामस्थांच्या सतर्कतेने जिवदान मिळालेय.चारा आणि पाण्याच्या शोधात हे हरीण नवनाथ त्र्यंबक आहिरे ममदापुर यांच्या विहीरीत पडले असता आहिरे हे शेतकामानिमित्ताने शेतात गेले असता हरीण पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वन विभागीय वनसेवकांना कळविले.काही वेळातच वनसेवक पोपट वाघ,वनकर्मचारी दत्तु गोसावी,मनोहर दाणे,मछिंद्र ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आणि या हरणाला बाहेर काढण्यात यश आले..
तपासणी केली असता हरीण कुठेही जखमी झाले नसल्याने वनसेवक आणि वनकर्मचारी यांनी हरणाला पुन्हा वन विभागात सोडुन दिले.
येवल्याचा उत्तर पूर्व भाग हा वन्यक्षेत्राने वेढलेला आहे.या भागात हरिणांची संख्या जास्त प्रमाणात आहे राजापूर,ममदापुर,देवदरी,सोमठाणे,रेंडाळे इत्यादी गावे वन्यक्षेत्रालगत असून या भागात हरिणांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असुन हरणांची संख्या जास्त प्रमाणात आहे.सध्याचा घडीला उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे वनक्षेत्रातील हिरव्या चाऱ्याची आणि पाण्याची कमतरता भासत असल्याचे चिञ दिसत आहे..
प्रतिनिधी - विजय खैरनार, येवला