नागपुर हिंगणघाट दरम्यान धक्कादायक प्रकार
गुंडाची हिंगनघाट रेल्वे स्थानकावर रेल्वे बोगीवर दगड़फेक
दगडफेकीत रेल्वे अधिकारीसह प्रवासी जखमी
विकलांग आरक्षित बोगीतील प्रवाशांना बेदम मारहाण
वर्धा/प्रमोद पाणबुडे:
दुपारी साडेबाराचे सुमारास नागपुर रेल्वेस्थानकावरुन प्रस्थान झालेल्या नई दिल्ली - चेन्नई गाड़ी क्रमांक १२६१६ ग्रान्टट्रंक एक्सप्रेस मध्ये धावत्या गाडीत नागपुर हिंगणघाट दरम्यान येथील सशस्त्र गुंडानी हौदोस घालून प्रवाशांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाड़ी थांबली असता गुंडानी विकलांग बोगीवर दगडफेक करीत पळ काढला.
यात शेख शाबिरला शास्त्री वार्ड हिंगणघाट हा आरोपी पोलिसांचे हाती लागला तर उर्वरित ९ आरोपी फरार आहेत. या दगड फेकित रेल्वे पोलिस अधिकारी एस. सी. झा यांचे डोक्याला दगड लागून जखमी झाले. तर गाडीतिल अनेक प्रवाशी जखमी झाले. फिर्यादि दिनेशकुमार तुण्डाराम मीना वय २१ वर्षे, रविकुमार बैरवा वय १९ वर्षे ,पिंटू बैरवा वय २० वर्षे सर्व राहणार दौसा राजस्थान यांचे तक्रारी वरुन आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन फरार आरोपिनचा शोध घेणे सुरु आहे.
या घटनेबाबत सविस्तार माहिती अशी की आज दुपारी साडेबाराचे सुमारास ग्राण्ट ट्रंक एक्सप्रेस मधील विकलांग आरक्षित बोगित नागपुर रेल्वे स्थानकावरुन सर्व आरोपी हिंगनघाट करिता बसले. त्यापूर्वी हे आरोपी पचमढ़ी येथील यात्रा आटपुन नागपुरला आले. त्यांनी स्टेशन बाहेर दारू ढोसली व गाडीत बसले त्याचे सोबत दारू च्या बाटल सुध्दा होत्या. नागपुर रेल्वे स्थानकावरुन गाडीचे प्रस्थान झाल्यानंतर आरोपिनी ठिकठिकाणी गाडीची चैन ओढूंन गाडी थांबवीली.
व झाडांच्या फांदया तोडून पुन्हा गाडीत बसले. व प्रवाशांना मारहाण केली. सर्व आरोपी बिनदिक्कत पने गाडीत दारू व सिगरेट पेउन प्रवाशांना चाकू दाखउन धमकाउ लागले. त्यामुळे प्रवाशात दहशत निर्माण झाली. सेवाग्राम रेल्वे सस्थानकावर गाड़ी थांबली असता आरोपिनी गार्ड व टिकिट तपासनिकाला मारहाण केल्याचे कळते. सेवाग्राम रेल्वे स्थानकावरुन गाड़ी सुटल्यानंतर गार्ड ने हिंगनघाट रेल्वे स्टेशन उप प्रबंधक शीतल यांना गाडीत सुरु असलेल्या घटनेची माहिती दिली.
उपप्रबंधकानी त्वरित रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर रेलवेपोलिस उपनिरीक्षक एस. सी. झा व पोलिस कॉन्स्टेबल ख़राळे यांना हिंगनघाट रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले. तत्पुर्वि रेल्वे स्थानकापासुन २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वना नदीच्या पुलावर आरोपिनी गाडीची साखळी ओढुन गाड़ी थाबवीली व पुन्हा गाड़ीवार दगडफेक सुरु केली व गाड़ी सुरु झाल्यावर पुन्हा गाडीत बसले. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाड़ी थाबताच पुन्हा दगडफेक सुरु करत पळ काढला. त्यापैकी शेख साबीर शेख ताज वय 21 रा शास्त्री वार्ड हा पोलिसांचे हाती लागला. या दगडफेकित रेल्वे पोलीस निरीक्षक झा यांचे डोक्याला दगड लागून जखमी झाले.
दरम्यान प्रधान आरक्षक शेख रहमान, आरक्षक अरविंद मोरे, मोहम्मद अंसारी हे कर्मचारी सुद्धा पोलिसांचे मदतीला धाउन आले. घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते सुद्धा घटना स्थळी दाखल झाले. या घटनेमुळे ग्रान्ट ट्रंक एक्सप्रेस तब्बल१५ मिनिटे हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थाबली. व दुपारी २ वाजुन ४० मिनिटानी प्रस्थान केले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गोलू पेटकर सह आरोपी रितेश ठाकरे, विजय वाघ, पोपट,कादर,लकी,गजु, लाला व आशु माकोड़े फरार असल्याचे सांगून शोध सुरु असल्याचे सांगितले.फिर्यादिनचे तक्रारिवरुन आरोपिवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.